

मुदाळतिट्टा; पुढारी वृत्तसेवा : कागल तालुक्यातील चिमगाव येथील सरपंच पदाची लढत अनेकांच्या भुवया उंचावणारी ठरली. चिमकाई देवी ग्रामविकास आघाडी विरूद्ध भावेश्वरी ग्राम विकास आघाडी अशी दुरंगी लढत झाली. सरपंच पदासाठी सागर आगंज आणि दीपक आंगज यांच्यात थेट सामना रंगला. यामध्ये मुश्रीफ गटाचे दीपक यशवंत आंगज हे ११२७ मतांनी विजयी झाले. तर आघाडीच्या सागर आंगज यांना १०४३ मते मिळाली. दीपक आंगज यांचा 84 मतांनी विजय झाला.
मागील पंचवार्षिक निवडणुकीत मंडलिक गटाकडून सरपंच झालेल्या पूजा दीपक आंगज यांचे पती दीपक आंगज हे सरपंच पदासाठी इच्छुक होते. त्यांना मंडलिक गटातून जोरदार विरोध झाला. तरीही दीपक आंगज हे उमेदवारीवर ठाम होते. त्यांना रोखण्यासाठी गावातील मंडलिक, राजे, पाटील आणि घाटगे असे सर्व गट एकत्रित येऊन आघाडी केली होती. आठ कोटी निधी देणाऱ्या आमदार हसन मुश्रीफ यांच्या गटासोबत दीपक आंगज यांनी जावून भावेश्वरी आघाडी केली. आंगज यांनी कामाच्या जोरावर उमेदवारी जाहीर केली पण सर्व गट विरोधात ठाकल्याने विजयापर्यंत पोहोचणे त्यांच्यासाठी अवघड होते. अखेर दीपक आंगज यांनी सागर आंगज या मंडलिक, राजे, पाटील व घाटगे गटाच्या आघाडी उमेदवारास ८४ मतांनी पराभूत केले आहे. त्यामुळे या निकालाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. आघाडीच्या सर्व जागा जिंकून आल्या आहेत.
मंडलिक, राजे, पाटील, घाटगे यांच्या आघाडीचे विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते : सर्जेराव मारूती अवघडे (२३४), अस्मिता विश्वास चौगले (२४७), आनंदा बापू करडे (३४६), कविता विश्वनाथ करडे (३१३), सोनाली तानाजी मांगले (३४५), आनंदा बाळू चौगले (३६९), सुलोचना मारूती कांबळे (३६८), रेश्मा सुरेश गुरव (४२५), सागर सदाशिव भोई (३३७), संजय शिवाजी एकल (२९८), संगीता लक्ष्मण फराकटे (३६०)
हेही वाचा :