kolhapur News: ‘सर्पजनजागृती’ अभियानातून वाड्यावस्त्यांवरील ८०० विद्यार्थी, लोकांचे प्रबोधन

kolhapur News
kolhapur News
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन: खेड्यापाड्यातल्या, वाड्यावस्त्यांवरील, डोंगराळ, दुर्गम ग्रामीण भागातल्या कष्टकरी आणि दिवसभर रानात राबणाऱ्या शेतकऱ्यांचा जीव महत्त्वाचा आहे. सापाबद्दल असणाऱ्या अंधश्रद्धा, गैरसमज आणि अज्ञान यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये आणि त्याचवेळी निसर्गातील, जैवसाखळीतील 'साप' या महत्त्वाच्या घटकाला नाहक मारले जाऊ नये; म्हणून 'वर्ल्ड फॉर नेचर'ने 'सर्पजनजागृती अभियान' (kolhapur News) सुरू केले आहे. या अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील वाड्यावस्त्यांवर सर्पजनजागृती मोहीम राबवली जात आहे, अशी माहिती वर्ल्ड फॉर नेचरचे अभिजीत वाघमोडे (kolhapur News) यांनी दिली.

'सर्पजनजागृती' अभियानाच्या माध्यमातून आत्तापर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातील वाड्यावस्त्यांवरील ८०० विद्यार्थी आणि लोकांचे प्रबोधन करण्यात आले आहे. हे अभियान वर्षभर अविरतपणे सुरू असते. वाड्यावस्त्यांवरील लोकांचे प्रबोधन करणे, त्यांना योग्य मार्गदर्शन करणे, त्यांतील समज-गैरसमज दूर करणे आणि त्यांना वैद्यकीय उपचारासाठी सदैव मदत करणे हे या अभियानाचे कार्यस्वरूप (kolhapur News) आहे.

दरवर्षीप्रमाणे यावेळीही नागपंचमी सणाचे औचित्य साधून वर्ल्ड फॉर नेचरच्या सर्व टीमने गेल्या ३ दिवसात ग्रामीण भागांतील, वाड्यावस्त्यांवरील शाळेत आणि गावांत जाऊन जवळपास ८०० विद्यार्थी आणि आणि लोकांचे प्रबोधन केले आहे. सामाजिक बांधिलकी आणि निसर्गाप्रति सेवाभाव म्हणून या आपल्या जीवाभावाच्या माणसांना जपणे, वन्यजीवांना जपणे, निसर्गाला जपणे हेच आमचे आद्यकर्तव्य आहे आणि असेल, असे वर्ल्ड फॉर नेचरचे अभिजीत वाघमोडे (kolhapur News) यांनी दिली आहे.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news