सांगली : सावळजमध्ये सर्पदंशाने मुलीचा मृत्यू | पुढारी

सांगली : सावळजमध्ये सर्पदंशाने मुलीचा मृत्यू

तासगाव : पुढारी वृत्तसेवा सावळज (ता. तासगाव) येथील कुमारी प्रांजल प्रमोद माळी (वय 8) या मुलीचा सर्पदंशाने दुर्दैवी मृत्यू झाला. (मंगळवार) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास राहत्या घरात विषारी सापाने प्रांजलला दंश केला होता.

सर्पदंशानंतर प्रांजलला उपचारासाठी सावळज येथील बालाजी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले. परंतू प्रांजल अधिकच अत्यावस्थ असल्याने तिला पुढील उपचारासाठी सांगलीला हलविण्यास डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान उपचारापूर्वीच प्रांजलची प्राणज्योत मालवली.

सावळज येथील एस. के. इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या प्रांजलच्या मृत्यूची बातमी सावळजमध्ये वाऱ्यासारखी पसरली. तिच्या मृत्यूमुळे सावळज गाव शोकाकुल झाले आहे. इतक्या लहान वयाच्या मुलीचा सर्पदंशाने झालेला मृत्यू अत्यंत दुर्दैवी असल्याच्या भावना गावकरी व्यक्त करत आहेत.

हेही वाचा : 

Back to top button