कोल्‍हापूर : म्हासुर्ली माजी ग्रा.पं. सदस्यांनी दिला आमरण उपोषणाचा इशारा

कोल्‍हापूर : म्हासुर्ली माजी ग्रा.पं. सदस्यांनी दिला आमरण उपोषणाचा इशारा
Published on
Updated on

म्हासुर्ली (कोल्‍हापूर) : पुढारी वृत्तसेवा : म्हासुर्ली येथील सरपंच मीनाताई भिमराव कांबळे यांनी हेतुपूर्वक एप्रिल २०२१ ची मासिक सभा घेतली नाही. यावर सर्व सदस्यांनी आक्षेप घेत गटविकास अधिकारी राधानगरी यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रार दिली होती. तक्रार नोंदवून घेतली तरी त्यावर योग्य अशी कारवाई होण्याबाबत चालढकल केली आहे.

याबाबत वारंवार विचारणा होवूनही आम्हाला जाणीवपूर्वक डावलले जात असल्याचा आरोप सर्व सदस्यांचा आहे. मासीक सभा न घतलेने ग्रामपंचायत सरपंच कारवाईस पात्र आहेत. सरपंचांवर योग्य ती कारवाई न झालेस प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा ग्रामपंचायतीच्या सदस्य मंडळातील अपात्र सदस्य बाबुराव सदाशिव कांबळे यांनी दिला आहे.

अकरा सदस्य संख्या असणाऱ्या येथील ग्रामपंचायतीची सन २०२० -२१ मध्ये पंचवार्षिक निवडणूक झाली. सरपंचपद मागासवर्गीय महिला प्रवर्गासाठी आरक्षित असल्याने मीनाताई कांबळे या सरपंच झाल्या. पुढे ग्रामपंचायत कामकाजात त्यांच्या कुटुंबियांचा हस्तक्षेप वाढत गेला. एकाधिकारशाहीची चिन्हे बळावत गेली. सरपंच व इतर सदस्य यांच्यात एक वाक्यता न राहिल्याने गावच्या ठळक विकासाला खिळ बसत गेली. ग्रामपंचायत कामकाजात गावचे प्रश्न जैसे थेच राहत कुरघोडीचे राजकारण होवू लागले. गायरान अतिक्रमणाच्या मुद्द्यावरुण सदस्य बाबुराव कांबळे यांना अपात्र ठरवण्यात आले.

शासनाच्या कारवाईस आपण पात्र ठरलो मग सरपंच यांच्यावर कारवाई होणेस का टाळाटाळ होत आहे. असा बाबुराव कांबळे यांचा सवाल आहे. गावच्या प्रश्नांवर चर्चा होण्यासाठी ग्रामपंचायतीची मासिक सभा घेणे हे अनिवार्य असताना. हेतूपूर्वक एप्रिल २०२१ ची मासिक सभा सरपंच यांनी घेतली नाही. यावर सर्वच सदस्यांकडून आक्षेप घेण्यात आला.

ग्रामपंचायत १९५८ कलम ३९ नुसार सरपंच हे कारवाईस पात्र आहेत. त्या संदर्भात तक्रार देवूनही जाणीव पूर्वक कारवाई झालेली नाही. कारवाईच्या माध्यमातून आम्हाला न्याय मिळेल या प्रतिक्षेत आजवर होतो पण त्यात अधिकच दिरंगाई होत असल्याचे ग्रा पं सदस्यांचे म्हणणे आहे.

२६ जानेवारी पर्यंत  वाट पाहणार असून वेळीच कारवाई न झालेस प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी कार्यालया समोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा सदस्य मंडळातील अपात्र ग्रा.पं. सदस्य बाबुराव सदाशिव कांबळे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
अदृष्य शक्तींचा हात गावच्या प्रश्नांशी अथवा विकासाशी देणेघेणे नसताना गावच्या राजकारणात अस्थिरता निर्माण करण्याचे काम अप्रत्यक्ष रित्या काहींकडून होत असल्याचा लोकांचा आरोप आहे. काही दिवसांपासून ग्रामपंचायतीत चाललेली अनागोंदी या प्रकाराचाच भाग असल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news