कोल्हापूर : हालोंडीजवळ चारचाकीच्या धडकेत माजी उपसरपंचाचा मृत्यू | पुढारी

कोल्हापूर : हालोंडीजवळ चारचाकीच्या धडकेत माजी उपसरपंचाचा मृत्यू

शिरोली एमआयडीसी; पुढारी वृत्तसेवा : भरधाव चारचाकीची मोपेडला जोराची धडक बसून झालेल्या अपघातात हालोंडी (ता. हातकणंगले) येथील अनिल शिवगोंडा पाटील  (वय ४९) यांचा मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी (दि.९) मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास हालोंडी फाटा येथे झाला होता. हालोंडी जवळ  मध्यरात्री अपघात होवून मृत्यू होण्याची ही दुसरी घटना आहे. दोन महिन्यापुर्वी एका तरुण अभिनेत्रीचा मृत्यू झाला होता. यामुळे हालोंडी फाटा हा अपघात प्रवण क्षेत्र ठरत आहे.

शिरोली एमआयडीसी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अनिल पाटील हे मोपेड गाडीवरून घरी जात होते. दरम्यान वडणगे येथील जीप चालक रामदास मारुती धनवडे याने भरधाव वेगाने व निष्काळजीपणाने वाहन चालवून अनिल पाटील यांच्या मोपेडला समोरासमोर धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ कोल्हापूर येथील सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

या अपघाताची फिर्याद त्यांचे भाऊ सुनिल पाटील यांनी दिली असुन ( रा. वडणगे ता. करवीर) रामदास मारुती धनवडे यांच्यावर शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास स. पो. निरिक्षक सागर पाटील करत आहेत. मृत अनिल पाटील यांच्या मागे आई, पत्नी, मुलगा, व मुलगी असा परिवार आहे. हालोंडी जवळ अशा रितीने मध्यरात्री अपघातात मृत्यू होण्याची दुसरी घटना आहे . दोन महिन्यापुर्वी एका तरुण अभिनेत्रीचा मृत्यू झाला होता. यामुळे हालोंडी फाटा हा अपघात प्रवण क्षेत्र ठरत आहे.

हेही वाचा;

Back to top button