कोल्हापूर : भोगावतीची पहिली उचल ३१००रुपये; सहा लाख टन गाळपाचे उद्दिष्ट

कोल्हापूर : भोगावतीची पहिली उचल ३१००रुपये; सहा लाख टन गाळपाचे उद्दिष्ट

राशिवडे; पुढारी वृतसेवा : भोगावती साखर कारखान्याच्या वतीने चालू गळीत हंगामासाठी ३१०० रुपये प्रति टन पहिली उचल देण्यात येणार आहे. या हंगामात सहा लाख टन गाळपाचे उद्दिष्ट आहे. शेतकरी, सभासदांनी आपला ऊस गाळपासाठी भोगावतीला पाठवावा, असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष आमदार पी.एन.पाटील यांनी केले. ६५ व्या ऊस गळीत हंगाम शुभारंभप्रसंगी  ते बोलत होते. कारखान्याच्या संचालिका सरस्वती पाटील व बळवंत पाटील या दांपत्याच्या हस्ते गव्हाणीत मोळी टाकून गळीत हंगामाचा  शुभारंभ झाला.

यावेळी आमदार पाटील म्हणाले की, आम्ही अत्यंत काटकसरीने कारखाना चालवला आहे. सत्ताकाळातील ६४ महिन्यापैकी ६२ महिन्यांचा कर्मचारी पगार दिला आहे. मालखरेदीमध्ये बचत केली आहे. पूर्व हंगाम खरेदी निम्म्याने केली असुन शासनाने साखरेला चांगला दर दिल्यास शेतकऱ्यालाही दर देता येईल. यासाठी शासनाने विशेष लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.

या वेळी नेमबाज ध्रुव पाटील सडोलीकर व स्वप्नील कुसाळे यांचे सत्कार करण्यात आले. स्वागत माजी संचालक बी. ए. पाटील यांनी केले. प्रास्ताविक प्रभारी कार्यकारी संचालक संजय पाटील यांनी तर सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी राजेंद्र पाटील यांनी केले.
याप्रसंगी कारखान्याचे उपाध्यक्ष उदयसिंह पाटील, जेष्ठ संचालक कृष्णराव किरुळकर,  गोकुळचे माजी संचालक पी. डी. धुंदरे, बाळासाहेब खाडे, बी. के. डोंगळे, पांडुरंग भांदिगरे, रविश पाटील कौलवकर, सुशिल पाटील, संदीप पाटील कुर्डु, करवीरचे माजी सभापती विजय भोसले, राशिवडेचे माजी सरपंच सागर धुंदरे यांच्यासह शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक व कारखान्याचे संचालक सभासद उपस्थित होते. प्रा. शिवाजीराव पाटील यांनी आभार मानले.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news