कोल्‍हापूर : गायरानातील अतिक्रमणे काढण्याविरोधात मोर्चा काढणार : आमदार सतेज पाटील

आमदार सतेज पाटील
आमदार सतेज पाटील

कसबा बावडा ; पुढारी वृत्तसेवा गायरानातील अतिक्रमणे काढविरोधात मोर्चा काढणार असल्याचे आमदार सतेज पाटील यांनी स्पष्ट केले. कसबा बावडा येथे एका कार्यक्रमाप्रसंगी निगवे दुमाला येथील ग्रामस्थांशी ते बोलत होते.

या वेळी सतेज पाटील म्हणाले, गायरानातील अतिक्रमणे ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत काढण्याचे आदेश उच्च न्यायालयाने राज्य शासनाला दिले आहेत. त्यानुसार जिल्हा जिल्ह्यामध्ये अतिक्रमणे काढण्यासंदर्भात प्रशासनाच्या हालचाली सुरू आहेत. यामुळे गेली कित्येक वर्ष आपल्या कुटुंबासह गायरानात निवारा करून राहत असलेल्या ग्रामस्थांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

राज्यातील लाखो ग्रामस्थांच्या निवाऱ्याचा प्रश्न आहे. या कार्यवाहीमुळे लाखो कुटुंबे बेघर होणार आहेत. त्यामुळे राज्य शासनाने या सर्व गोष्टींचा विचार करून या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करत या आदेशाला स्थगिती मिळवावी, अशी मागणीही त्यांनी केली.

ग्रामस्थांच्या महत्त्वाच्या प्रश्नात आवाज उठवला. त्याबद्दल निगवे दु ता. करवीर येथील ग्रामस्थांनी आमदार सतेज पाटील यांचे अभिनंदन केले. या कार्यवाहीविरोधात आपण जो निर्णय घ्याल, त्या प्रत्येक निर्णयात आम्ही  बरोबर आहोत, असे आश्वासन दिले. या वेळी सरपंच ज्‍योत्‍स्‍ना कीडगांवकर, माजी सरपंच सुरेश पाटील, दिलीप यादव, प्रकाश पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news