कोल्‍हापूर : जयसिंगपूर नांदणी परिसरात गवा आल्याने खळबळ

कोल्‍हापूर : जयसिंगपूर नांदणी परिसरात गवा आल्याने खळबळ

जयसिंगपूर : पुढारी वृत्तसेवा : सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास नांदणी येथील कोल्हापूर रोडवर गवा दिसून आला. त्यानंतर हा गवा नांदणी स्वाभिमानी इंडस्ट्रिज परिसरात दिसला. त्यानंतर हा गवा जयसिंगपूर शहरालगत असलेल्या चकोते स्कूल परिसरात दिसून आल्याने एकच खळबळ उडाली.

नागरिकांनी तात्काळ वन विभागाला माहिती देवून पाचारण केले. त्यानंतर वनविभागाने रात्री उशिरापर्यंत गव्याला पकडण्यासाठी सापळा लावला होता. मात्र हा गवा या भागात आला कसा आला असा सवाल नागरिकांना पडला आहे. त्याचबरोबर हा गवा सादळेमादळे परिसरातून बाहुबली, कुंभोज, तमदलगे, मजले डोंगरातून आला असावा असा अंदाज अनेकांनी बांधला आहे.

.हेही वाचा 

logo
Pudhari News
pudhari.news