रायगड : काशीद समुद्रात औरंगाबादमधील दोन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

file photo
file photo

मुरुड जंजिरा : पुढारी वृत्तसेवा : औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील दोन विद्यार्थ्यांचा काशीद समुद्रात बुडून मृत्यू झाला. ही घटना आज (दि.९) दुपारी तीनच्या सुमारास घडली. औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील सानेगुरुजी माध्यमिक शाळेची इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची सहल मुरूड तालुक्यातील काशीद समुद्र किनारा पाहण्यासाठी आली होती. यावेळी  ८० विद्यार्थ्यांचा समूह काशीद समुद्र किनारी उतरला होता. प्रणव कदम आणि रोहन बेडवाल अशी मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत.

यापैकी पाच  विद्यार्थी समुद्रात पोहण्यासाठी गेले. पोहता पोहता हे पाचही जण खोल पाण्यात गटांगळ्या खाऊ लागले. जवळच असणाऱ्या लोकांना मुले बुडत असल्याचे लक्षात येताच त्यांना वाचवण्यासाठी पाण्यात उड्या टाकल्या.  पाचपैकी तिघांना किनारी सुखरूप आण्यात आले. तर उर्वरित दोघे जण खोल पाण्यात गेल्याने त्यांचा बुडून झाला. यापैकी एकाचा मृतदेह त्वरित सापडला. तर दुसरा मुलगा हा सापडत नव्हता. स्थानिक नागरिकांनी  पोलिसांच्या मदतीने काही तासानंतर त्याचा मृतदेह शोधून काढला.

प्रणव कदम आणि रोहन बेडवाल यांचे वय १५ वर्षापर्यंत सांगण्यात आले आहे. या दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे मुरुड पोलिसांनी सांगितले. तर कृष्णा पाटील, तुषार वाघ व अन्य एकाला वाचवण्यात यश आले आहे. त्यांना बोर्ली प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले आहे.

हेही वाचलंत का ? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news