कोल्हापूर : महापूर परिस्थिती निर्माण झाल्यास, प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद द्या : उपधीक्षक साळवी

कोल्हापूर : महापूर परिस्थिती निर्माण झाल्यास, प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद द्या : उपधीक्षक साळवी

कुरुंदवाड; पुढारी वृत्तसेवा : सध्या पावसाने दडी दिली असली तरी आपत्ती ही सांगून येत नाही. २०१९ व २०२१ सालच्या महापुराचा अनुभव ग्रामस्थांना आहेच. अकस्मित महापुराची परिस्थिती निर्माण झाल्यास ग्रामस्थ व नागरिकांनी प्रापंचिक साहित्य सह योग्य वेळी पशुधनासह स्वतःहून स्थलांतर होऊन प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन इचलकरंजीचे पोलीस उपअधीक्षक समीरसिंह साळवी यांनी केले

दरम्यान अचानक महापुर परिस्थिती निर्माण झाल्यास यातून बाहेर पडण्यासाठी नदी ओलंडून जाण्याचा प्रयत्न करू नका. यामुळे जीवितहानी होऊ शकते. आपला जीव अनमोल आहे. शासनाने स्थलांतराच्या ठिकाणी सर्व-सोयी सुविधांचे आयोजन केले आहे. निष्काळजीणे स्थलांतर करू नका असे भावनिक आवाहन उपशिक्षक साळवी यांनी केले.

कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील मजरेवाडी, अकिवाट, राजापूर, राजापूरवाडी, खिद्रापूर नदीपलीकडील सात गावे अशा पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी उपधीक्षक साळवी आले असता खिद्रापूर ग्रामपंचायत येथे आढावा बैठकीत बोलत होते. कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बालाजी भांगे, सरपंच सारिका कदम, अमित कदम,इर्शाद मुजावर आदि उपस्थित होते.

यावेळी बोलताना ते म्हणाले, महापुराने जीवित व वित्त हानी होऊ नये या दृष्टिकोनातून पोलीस प्रशासनाने दक्षता घेतली आहे. ग्रामस्थांना स्थलांतर होण्यासाठी लागणाऱ्या वाहनासाठी तिन्ही गावातील चालक-मालकांची बैठक घेऊन वाहतुकीचे योग्य दर प्रादेशिक अधिकाऱ्यांमार्फत ठरवून घ्यावेत अशा सूचना केल्या.

या परिसरातील वीज वितरण कंपनी ग्रामपंचायत महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांकडून महापुराबाबत केलेल्या उपाय योजनांची माहिती घेतली. यावेळी बसगोंडा पाटील, रामगोंडा पाटील, गणेश पाखरे आदींनी सूचना मांडल्या. यावेळी चारही गावचे ग्रामसेवक,तलाठी,संजय पाटील,कुलदीप कदम,डॉ.मनोज मोकाशी, दानु पाटील, दादाखान मोकाशी,जहांगीर सनदी, दयानंद माने,हिदायत मुजावर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

हेही वाचा;

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news