पंतप्रधान मोदींना अमेरिकन संसदेत एक बेळगावकर नेणार | पुढारी

पंतप्रधान मोदींना अमेरिकन संसदेत एक बेळगावकर नेणार

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तीन दिवसीय आमेरिका दौर्‍यावर जाणार आहेत. यानिमित्त ते २२ जूनला अमेरिकन संसदेच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करणार आहेत. यावेळी व्यासपीठावर त्यांना घेऊन जाण्यासाठी भारतीय वंशाचे अमेरिकन खासदार श्रीनिवास ठाणेदार असणार आहेत. मूळचे बेळगावचे असलेले श्रीनिवास ठाणेदार हे डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते असून संसदेत मिशिगनच्या १३ व्या काँग्रेसनल जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतात.

२२ जून रोजी व्हाईट हाऊस येथे पंतप्रधान मोदींच्या सन्मानार्थ आयोजित केलेल्या राज्य भोजनासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी त्यांना आमंत्रित केले आहे. पंतप्रधान मोदी अमेरिकन संसदेच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी त्यांनी २०१६ मध्ये अमेरिकन संसदेला संबोधित केले होते. या संदर्भात श्रीनिवास ठाणेदार म्हणाले, मी आणि माझी पत्नी शशी पंतप्रधानांच्या अमेरिका भेटीची वाट पाहत आहोत. पंतप्रधानांसाठी हा ऐतिहासिक कार्यक्रम आहे. मला आशा आहे की पंतप्रधान अमेरिका आणि भारत यांच्यातील मजबूत संबंधांवर भर देतील.

हेही वाचलंत का? 

 

 

 

 

Back to top button