Pudhari shopping-food festival : खाद्य, खरेदी आणि धमाल एकाच छताखाली, दै. ‘पुढारी शॉपिंग अँड फूड फेस्टिव्हल’चे गडहिंग्लजमध्ये १२ ते १६ जानेवारीला आयोजन

Pudhari shopping-food festival : खाद्य, खरेदी आणि धमाल एकाच छताखाली, दै. ‘पुढारी शॉपिंग अँड फूड फेस्टिव्हल’चे गडहिंग्लजमध्ये १२ ते १६ जानेवारीला आयोजन
Published on
Updated on

गडहिंग्लज : पुढारी वृत्तसेवा, गडहिंग्लजकर ज्याची आतुरतेने वाट पाहत होते, तो खाद्य आणि खरेदीचा महोत्सव अर्थात दै. 'पुढारी' शॉपिंग अॅड फूड फेस्टिव्हल २०२४ ला १२ जानेवारीपासून प्रारंभ होत आहे. मनसोक्त खरेदी आणि लज्जतदार पदार्थांची मेजवानी एकाच छताखाली आणि तीही पाच दिवस मिळणार आहे. (Pudhari' shopping-food festival)

विविध प्रकारच्या खाद्य संस्कृतीचा आस्वाद घेण्यासोबत फेस्टिव्हलमधील विविध वस्तू चोखंदळ खरेदीला साजेशा अशाच असणार आहेत. कडगाव रोडवरील शिवराज महाविद्यालयाच्या प्रशस्त मैदानावर १६ जानेवारी अखेर हा महोत्सव चालणार आहे. फेस्टिव्हलमध्ये आकर्षक ऑफर्स, फ्री गिफ्ट्स, लाईव्ह डेमो असणार आहेत. याचबरोबर खाण्याचा आनंद देणाऱ्या फूड फेस्टिव्हलच्या सोबतीला चिमुकल्यांसाठी अॅम्युजमेंट पार्कची धमालही असणार आहे. स्टॉल बुकिंगसाठी – श्रेया ९४२३५३९५६१

Pudhari' shopping-food festival : सेलिब्रिटींशी गप्पा…

दै. 'पुढारी'च्या शॉपिंग फेस्टिव्हलमध्ये दि. १२ ते १६ जानेवारीपर्यंत आवडीच्या कलाकारांशी गप्पा मारण्याचीही संधी दरवर्षीप्रमाणे उपलब्ध असून, दररोज सायंकाळी मनोरंजनाचीही वेगळी मेजवानी रसिकांसाठी उपलब्ध आहे. यामुळे खरेदीसोबत विविध खाद्यपदार्थांसह मनोरंजनाचीही संधी मिळणार आहे.

फेस्टिव्हलमध्ये काय खरेदी कराल?

शॉपिंग फेस्टिव्हलमध्ये कॉस्मेटिक्स ज्वेलरी, गिफ्ट्स, टॉईज, फर्निचर आणि होम डेकॉर, गारमेंट्स, फूड प्रॉडक्ट्स, नॉव्हेल्टीज, होम अप्लायन्सेस, खाद्यपदार्थ, गिफ्ट्स यांचे स्टॉल्स उपलब्ध होणार आहेत. तसेच खास गृह सजावटी, चादरी, पडदे, फ्लॉवर पॉट्स, फ्रेम आर्टिफिशियल फुले यांचा समावेश आहे. सोफा, किचन अप्लायन्सेर अशा गोष्टींचा तर खजिनाच आहे. महिला व युवतींसाठी कपडे, दागिने सौंदर्यप्रसाधने, फुटवेअरचे असंख्य प्रकार पाहायला मिळतील तसेच लहान मुलांसाठी कपडे, खेळणी, पुस्तके आदींचाही समावेश आहे.

खाद्य मेजवानी काय असणार?

अस्सल कोल्हापुरी तांबडा-पांढरा रस्सा, फिश थाळी, तंदूर, कबाब, दम बिर्याणी, चिकन ६५, चौपाटी पदार्थ, दाबेली, साऊथ इंडियन पदार्थ, थालीपीठ, मोमोज, फास्ट फुड्स, थंड पेये, कस्टड आणि आइस्क्रीम अशा चविष्ट आणि प्रत्येकाच्या आवडीच्या पदार्थांची मेजवानी खवय्यांना मिळणार आहे.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news