Jitendra Awhad| “प्रभू राम बहुजनांचा, माझ्या वक्तव्यामुळे भावना दुखावल्या असतील तर…”; जितेंद्र आव्हाडांचा माफीनामा | पुढारी

Jitendra Awhad| "प्रभू राम बहुजनांचा, माझ्या वक्तव्यामुळे भावना दुखावल्या असतील तर..."; जितेंद्र आव्हाडांचा माफीनामा

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रभू रामासंदर्भातील वादग्रस्त वक्तव्याचावाल्मिकी रामायणात’  उल्लेख असल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केले आहे. तसेच मी कोणतेही भाष्य अभ्यासाशिवाय करत नाही. आजकाल अभ्यासाला महत्त्व नाही, तर भावनेला महत्त्व आहे. यावरून आजकाल (दि.४) अभ्यासाला नाही तर भावनेला अधिक महत्त्व आहे. त्यामुळे माझ्या कालच्या वक्तव्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर, मी खेद व्यक्त करतो, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेदरम्यान बोलताना रामभक्तांची माफी मागितली. ते शिर्डीतून आज (दि.४) पत्रकार परिषदेत बोलत होते.  (Jitendra Awhad)

प्रभूरामांवरी वाद मला वाढवायचा नाही- आव्हाड

प्रभू राम शाकाहारी नव्हे तर मासांहारी होते, असे वादग्रस्त वक्तव्य शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले होते. यामुळे वाद निर्माण झाला आहे. त्यावर आता आव्हाड यांनी खुलासा केला आहे. इतिहासाचा मी विपर्यास कधीच करत नाही. कालचं वाक्य मी ओघानं बोललो. प्रभूरामांवरी वाद मला वाढवायचा नाही. वाल्मिकी रामायणातील कंदांचा आव्हाडांनी संदर्भ दिला आणि त्यांनी केलेल्या वक्तव्याला पुष्टी देणारे या संदर्भातील पुरावे माध्यमांशी बोलताना सांगितले. (Jitendra Awhad)

राम बहुजनांचा, राम आमचा

राम बहुजनांचा आहे, राम हा आमचा आहे. राम क्षत्रीय आहे. शबरींची बोरं खाणारा आमचा राम आहे. त्यामुळे माझ्यावर गुन्हा दाखल झाला तरी घाबरत नसल्याचे देखील जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी बोलताना म्हटले आहे. (Jitendra Awhad)

रोहित काय बोलतात, त्याला मी महत्त्व देत नाही

रोहित पवार अजून लहान आहेत, त्यांना मी महत्त्व देत नाही. त्यामुळे रोहित पवार काय बोलतात त्याला मी महत्त्व देत नाही. सामाजिक भाष्य करताना, पक्षाचा विषय येत नाही, असेही आव्हाड यांनी म्हटले आहे.

हेही वाचा:

Back to top button