पंचगंगा नदीचा शिवतीर्थाच्या पायरीला अभिषेक; हेरवाड-तेरवाड, मजरेवाडी-कुरुंदवाड मार्गावर पाणी

पालिका प्रशासन नागरिकांना स्थलांतर करण्यात व्यस्त
Flood Water on Herwad-Terwad, Majrewadi-Kurundwad route
पंचगंगा नदीचा शिवतीर्थाच्या पायरीला अभिषेक; हेरवाड-तेरवाड, मजरेवाडी-कुरुंदवाड मार्गावर पाणीPudhari Photo
Published on
Updated on

कुरुंदवाड : पुढारी वृत्तसेवा

पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. कुरुंदवाड येथील शिवतीर्थ रस्ता ओलांडून 1 फुटाने रस्त्यावरून पाणी वाहू लागले आहे. तसेच हेरवाड-तेरवाड मार्गावर पाणी खेळू लागले आहे. कुरुंदवाड-मजरेवाडी रस्त्यावर पाणी आल्याने मार्ग बंद झाला आहे. रात्रीच पंचगंगेचे पाणी शिवतीर्थ रस्त्यावर पडल्याने शहरातील 70 टक्के नागरिक स्थलांतरीत झाले आहेत. तर पालिका प्रशासनातर्फे नृसिहवाडीपर्यंत ट्रॅक्टरने स्थलांतर केले जात आहे.

Flood Water on Herwad-Terwad, Majrewadi-Kurundwad route
Kolhapur Flood Updates | कोल्हापूरकरांना दिलासा, पंचगंगेची पाणी पातळी स्थिर

पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत रात्रीत वाढ झाली आहे. पंचगंगा नदीचा प्रवास शिवतीर्थ जवळून रस्ता ओलांडून शहरातून बस्तवाड मार्गे कृष्णा नदीच्या दिशेने प्रवास सुरू झाला आहे. आणखीन पाणी पातळी वाढणार या भीतीने 70 टक्के गावातील नागरिक स्थलांतरीत झाले आहेत, तर काही नागरिक स्थलांतर होत आहेत. सकाळपासून उर्वरित नागरिक ही स्थलांतर होत आहेत.

Flood Water on Herwad-Terwad, Majrewadi-Kurundwad route
Kolhapur Flood : तावडे हॉटेल येथून चारचाकी व अवजड वाहनांची वाहतूक सुरू

हेरवाड तेरवाड दरम्यानच्या सलगर सदलगा राज्य मार्गावर ही पाणी खेळू लागले आहे. अशीच पाणी पातळी वाढली तर दुपारपर्यंत हा मार्ग देखील बंद होण्याची शक्यता आहे. तसेच कृष्णा नदीचे पाणी कुरुंदवाड दरम्यानच्या मजरेवाडी रस्त्यावरील बीपीएड कॉलेज समोरून रस्त्यावर आल्याने हा रस्ता देखील वाहतुकीसाठी बंद झाला आहे.

Flood Water on Herwad-Terwad, Majrewadi-Kurundwad route
Kolhapur Flood | शहरात पूरस्थिती बिकट; प्रमुख पाच रस्ते बंद

शिवतीर्थ येथे वजीर रेस्क्यू फोर्स, इंडियन रेड क्रॉस सोसायटी रेस्क्यू फोर्स, व्हाईट आर्मी रेस्क्यू फोर्सचे जवान शिवतीर्थावर नागरिकांना नृसिंहवाडीपर्यंत स्थलांतर करण्यासाठी कार्यरत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news