Kolhapur Flood | शहरात पूरस्थिती बिकट; प्रमुख पाच रस्ते बंद

जिल्ह्याला पुराचा विळखा कायम
Kolhapur Flood
शहरात पूरस्थिती बिकट; प्रमुख पाच रस्ते बंदPudhari Photo
Published on
Updated on

कोल्हापूर: पुढारी वृत्तसेवा

शहरासह जिल्ह्यात पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला, तरी पंचगंगेच्या पातळीत संथगतीने वाढ सुरूच आहे. यामुळे कोल्हापूर शहरातील पूरस्थिती बिकटच होत चालली आहे. शनिवारी शहरातील मध्यवर्ती व्हीनस कॉर्नर, शाहूपुरी परिसरात पुराचे पाणी आल्याने शहरातील प्रमुख पाच मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले.

Kolhapur Flood
पंचगंगा पाणी पातळी 1 इंचने कमी, पाऊसही ओसरला

पंचगंगेच्या पातळीत अशीच वाढ होत राहिल्यास पुणे-बंगळूर महामार्गावर रविवारी पाणी येण्याची शक्यता आहे. उत्तरेश्वर पेठ, साळोखे पार्क, कदमवाडी, पंचगंगा तालीम परिसरात महापुरात अडकलेल्या ३४ नागरिकांना महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी बोटीने बाहेर काढले. आज दिवसभरात शहरासह जिल्ह्यात २ हजारांवर नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले असून, आजअखेर ७ हजारांवर नागरिकांचे स्थलांतर झाले आहे.

जिल्ह्यातही बाधित गावांचा पुराचा विळखा घट्टच होत चालला आहे. दरम्यान, राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे बंद झाले. धरणाचे सध्या दोनच दरवाजे खुले आहेत. शुक्रवारी ४६.४ फुटांवर असणारी पंचगंगेची पाणी पातळी शनिवारी सायंकाळी ९ वाजता ४७.८ फुटांवर पोहोचली. पाणी पातळी वाढतच चालल्याने शहरातील नागरी वस्त्यांत शिरलेले पाणी पुढे पुढे सरकत आहे. महावीर गार्डनच्या पिछाडीस आलेले पाणी आज सकाळी ११ च्या सुमारास उद्योग भवन परिसरात आले.

दुपारपर्यंत त्यातून वाहतूक सुरू होती. सायंकाळी मात्र त्या ठिकाणी पाणी पातळी दोन फुटांपर्यंत गेल्याने जिल्हाधिकारी कार्यालय ते स्टेशन रोड या मार्गावरील वाहतूक दोन्ही बाजूंनी बॅरिकेडिंग लावून बंद करण्यात आली. या परिसरातील अनेक अपार्टमेंटच्या बेसमेंटमध्ये दोन दिवसांपासूनच पाणी शिरले होते. त्याची पातळी आज दीड-दोन फुटांनी वाढली. यामुळे बहुतांशी अपार्टमेंटमधील नागरिकांनी सुरक्षितस्थळी स्थलांतर सुरू केले.

अप्सरा टॉकीजकडून पुढे येणारे पाणी व्हीनस कॉर्नर परिसरात पसरत गेले. यामुळे सकाळी व्हीनस कॉर्नर ते दसरा चौक या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली. या मार्गावरील तळमजल्यावर असणाऱ्या काही दुकाने, हॉटेल आणि कार्यालयांत पाणी शिरले. व्हीनस कॉर्नर ते कोंडा ओळ हा मार्ग शुक्रवारपासूनच बंद आहे. यामुळे या परिसरातील प्रमुख तीन मार्ग बंद झाले.

शाहूपुरी कुंभार गल्लीत पसरलेले पुराचे पाणी पंचमुखी गणेश मंदिरसमोरून पुढे मुख्य रस्त्यावर आले. यामुळे लक्ष्मीपुरी ते गवत मंडई हा रस्ता सायंकाळी बंद करण्यात आला. भाऊसिंगजी रोडवरील जयंती नाल्यावरील पाणी पातळीत आज वाढ झाली. लक्षतीर्थ वसाहत येथील आयडियल कॉलनी, गायकवाडवाडा, पंचगंगा तालीम, सुतारवाडा, सीता कॉलनी, सीपीआर चौक,

खानविलकर पेट्रोल पंपाच्या पिछाडीस असणाऱ्या विश्वकर्मा अपार्टमेंटच्या पिछाडीस, विन्स हॉस्पिटल, पोलो ग्राऊंड रमणमळा पॅलेस ऑर्चिड अपार्टमेंट, माळी मळा, उलपे मळा, मुक्त सैनिक वसाहत, सफायर पार्क कदमवाडी, बापट कॅम्प, जाधववाडी ते कदमवाडी या परिसरात शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी पुराचे पाणी आणखी आत शिरले होते. तासागणीक वाढणाऱ्या पंचगंगेच्या पाणी पातळीमुळे २०१९ आणि २०२१ च्या महापुरासारखी स्थिती उद्भवण्याची भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.

जिल्ह्यातील पूरबाधित गावांचा विळखा घट्टच होत चालला आहे. आंबेवाडी, चिखली, वडणगे, वरणगे, पाडळी आदी गावांना पूर्णपणे वेढा पडला आहे. पंचगंगेच्या पुराचे पाणी कोल्हापूर-पन्हाळा रस्त्यावर पोवार पाणंदपासूनही पुढे पेट्रोल पंपासमोर आले होते. यामुळे आंबेवाडी, चिखली, वडणगेकडे जाण्याचे मार्ग पूर्ण बंद झाले.

कोल्हापूर-गगनबावडा मार्ग पूर्ण बंद आहे. कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावरील वाहतूक वाठार- वारणानगरमार्गे वळवण्यात आली आहे. कोल्हापूर-गारगोटी मार्ग तिसऱ्या दिवशीही बंद होता. गेल्या २४ तासांत जिल्ह्यातील १० पैकी १४ धरण क्षेत्रांत अतिवृष्टी झार्ल आहे. मात्र, दिलासादायक बाब म्हणजे शनिवारी सायंकाळी ६ वाजून ५८ मिनिटांनी राधानगरी धरणाचा ४ नंबरच व सायंकाळी ७ वाजून १० मिनिटांनी नंबरचा असे दोन स्वयंचलित दरवाजे बंद झाले.

सध्या धरणाचे ६ व ७ नंबरचे एकूण दोन दरवाजे खुले असून धरणातून ४,३५६ क्युसेक विसर्ग सुरूव आहे. गेल्या दहा दिवसांच्या तुलनेत शनिवारी शहरात पावसाचा जोरदेखील कमी झाला होता. शहरात सकाळपासून अधूनमधून कोसळणाऱ्या सरी वगळत पावसाने चांगली उघडीप दिली.

४०२ कच्च्या घरांची पडझड नाल्यावरील पाणी पातळीत आज वाढ झाली. लक्षतीर्थ वसाहत येथील आयडियल कॉलनी, गायकवाडवाडा, पंचगंगा तालीम, सुतारवाडा, सीता कॉलनी, सीपीआर चौक, खानविलकर पेट्रोल पंपाच्या पिछाडीस असणाऱ्या विश्वकर्मा अपार्टमेंटच्या पिछाडीस, विन्स हॉस्पिटल, पोलो ग्राऊंड रमणमळा पॅलेस ऑर्चिड अपार्टमेंट, माळी मळा, उलपे मळा, मुक्त सैनिक वसाहत, सफायर पार्क कदमवाडी, बापट कॅम्प, जाधववाडी ते कदमवाडी या परिसरात शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी पुराचे पाणी आणखी आत शिरले होते.

तासागणीक वाढणाऱ्या पंचगंगेच्या पाणी पातळीमुळे २०१९ आणि २०२१ च्या महापुरासारखी स्थिती उद्भवण्याची भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. गेल्या २४ तासांत पावसामुळे जिल्ह्यातील ४८ पक्क्या घरांची, तन ४०२ कच्च्या घरांची पडझड झाल आहे. याशिवाय जनावरांच्या ५० गोठ्यांचीही पडझड झाली आहे. चान सार्वजनिक मालमत्तांचे १ लाख ९७ हजार रुपयांचे, तर ५०३ खासर्ग मालमत्तांचे २ कोटी २ लाख ८५ हजान रुपयांचे नुकसान झाले.

राधानगरीसह १४ धरण क्षेत्रांत अतिवृष्टी

गेल्या २४ तासांत राधानगरी १८०, तुळशी १७८, वाराणा ७३ दूधगंगा १५०, कासारी ९७, कडर्व १०५, पाटगाव १८०, चिकोत्रा १८० चित्री १३७, जंगमहट्टी ८६, घटप्रभा

Kolhapur Flood
Kolhapur Flood Updates | कोल्हापूरकरांना दिलासा, पंचगंगेची पाणी पातळी स्थिर

१९० हून अधिक गावांचा थेट संपर्क तुटला

जिल्ह्यातील नद्यांनी धोका पातळी ओलांडल्याने ९५ बंधारे पाण्याखील गेले आहेत. १० राज्य, ४८ प्रमुख जिल्हा मार्ग असे एकूण ५८ मार्ग बंद झाले आहेत. यामुळे १९० हून अधिक गावांचा थेट संपर्क तुटला आहे. ४९ मार्गांवरील एस. टी. सेवा बंद झाली आहे.

शहरातील हे प्रमुख मार्ग बंद

  • दसरा चौक ते कसबा बावडा

  • व्हीनस कॉर्नर ते दसरा चौक

  • कोंडा ओळ ते व्हीनस कॉर्नर

  • जिल्हाधिकारी कार्या ते स्टेशन रोड

  • शाहूपुरी ६ वी गल्ली

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news