‘स्मॅक’च्या अध्यक्षपदी दीपक पाटील, उपाध्यक्षपदी एम. वाय. पाटील यांची फेरनिवड

‘स्मॅक’च्या अध्यक्षपदी दीपक पाटील, उपाध्यक्षपदी एम. वाय. पाटील यांची फेरनिवड
Published on
Updated on

शिरोली एमआयडीसी; पुढारी वृत्तसेवा : शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन कोल्हापूर (स्मॅक)च्या अध्यक्षपदी दीपक पाटील, तर उपाध्यक्षपदी एम. वाय. पाटील यांची फेरनिवड झाली. तसेच स्मॅक आयटीआयच्या चेअरमनपदी आर.एन.डी इंडस्ट्रीजचे राजू पाटील व शिरोली सॅण्ड रेक्लेमेशन प्लांट चेअरमन पदी श्रीराम फाउंड्री ग्रुपचे निरज झंवर यांची सर्वानुमते फेर निवड करण्यात आली आहे.

शिरोली औद्योगिक क्षेत्रातील उद्योजक व कामगारांच्या आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी कार्यरत असणाऱ्या 'स्मॅक' या संस्थेच्या संचालक मंडळाची ४९ वी सभा शुक्रवारी अध्यक्ष दीपक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी २०२२-२३ सालाकरिता 'स्मॅक'च्या अध्यक्षपदी आर. ए. पी. इंडस्ट्रीजचे दीपक पाटील तर उपाध्यक्षपदी रत्ना उद्योगचे एम. वाय. पाटील यांची फेर निवड करण्यात आली. ट्रेजरर पदी चौगले सिमेंट पाईप कं. चे जयदीप चौगले व ऑ. सेक्रेटरी पदी शुभम कास्टिंग्स प्रा. लि. चे शामसुंदर तोतला यांच्या निवडी करण्यात आल्या.

संचालक मंडळाच्या आज झालेल्या बैठकीत या निवडी करण्यात आल्या आहेत. सर्व नूतन पदाधिकाऱ्यांना पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी ज्येष्ठ संचालक सुरेंन्द्र जैन, अतुल पाटील, प्रशांत शेळके, जयदत्त जोशीलकर, भरत जाधव, स्वीकृत संचालक रवी डोली व स्मँकचे सेक्रेटरी जितेंद्र बामणे उपस्थित होते. आभार एम. वाय. पाटील यांनी मानले.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news