Air India : महिलेवर लघुशंका करणे भोवले, ‘शंकर मिश्रा’ची वेल्स फार्गोच्या उपाध्यक्षपदावरून हकालपट्टी | पुढारी

Air India : महिलेवर लघुशंका करणे भोवले, 'शंकर मिश्रा'ची वेल्स फार्गोच्या उपाध्यक्षपदावरून हकालपट्टी

पुढारी ऑनलाइन डेस्क : एअर इंडियाच्या फ्लाईटमध्ये महिलेवर लघुशंका करणा-या शंकर मिश्राची तो काम करत असलेल्या कंपनीतून हकालपट्टी करण्यात आली आहे. तो वेल्स फार्गोच्या इंडिया चॅप्टरचे उपाध्यक्ष पदावर होता. याविषयी कंपनीने स्पष्टीकरण दिले आहे. 26 नोव्हेंबर 2022 रोजी एअर इंडियाच्या फ्लाईटमध्ये आपल्या महिला सहप्रवाशावर लघवी केल्याची अप्रिय घटना लक्षात घेऊन कंपनीने ही कारवाई केली आहे. (Air India)

कंपनीने या संदर्भात निवेदन जारी केले आहे. कंपनीने म्हटले आहे कंपनीत कर्मचा-यांची नियुक्ती त्यांच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक वर्तानाच्या सर्वोच्च मानकांवर अवलंबून असते. मिश्रा याच्या कृत्यामुळे कंपनीवर झालेले आरोप आम्हाला खूप त्रासदायक वाटतात. त्यामुळे आम्ही त्याला काढून टाकले आहे. तसेच आम्ही कायद्याच्या अंमलबजावणीला सहकार्य करत आहोत. (Air India)

वेल्स फार्गो ही एक अमेरिकन वित्तीय संस्था आहे. शंकर मिश्रा हा वेल्स फार्गोच्या इंडिया चॅप्टरचा उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होता. सध्या मिश्रा हा फरार आहे. दिल्ली पोलिसांनी त्याच्यासाठी लुक आऊट सर्कुलर जारी करत अधिका-यांना पत्र लिहिले आहे. (Air India)

(Air India) इंडिया टुडेने दिलेल्या माहितीनुसार, मिश्रा हा संपर्कात नाही आणि तो पोलिस तपासात सामील होत नाही. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. “मिश्रा हा मुंबईचा रहिवासी आहे. आम्ही आमची टीम मुंबईला त्याच्या ओळखीच्या ठिकाणी पाठवली होती पण तो फरार होता. आमची टीम त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहे,” असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले.

हे ही वाचा :

अयोध्येतील राम मंदिर उडवू; ‘अल-कायदा’ची धमकी

Air India : ‘लघुशंका’प्रकरणी एअर इंडियाची ‘त्या’ मद्यधुंद पुरुषावर मोठी कारवाई

Air India | मद्यधुंद पुरुषाने महिलेवर केली लघुशंका, एअर इंडियाच्या बिझनेस क्लासमधील धक्कादायक प्रकार

Back to top button