kolhapur Ganesh Utsav : कोल्हापूरकरांना यंदा चांद्रयान मोहिमेसह ‘अमरनाथ’, ‘केदारनाथ’ मंदिराचे दर्शन घडणार

kolhapur Ganesh Utsav
kolhapur Ganesh Utsav

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : यंदाचा गणेशोत्सवही गतवर्षीप्रमाणेच दहा दिवसांचाच आहे. यामुळे बहुतांशी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पहिल्या दिवसापासूनच मोठ्या आणि वैशिष्ट्यपूर्ण गणेशमूर्ती आणि देखाव्यांच्या प्रतिकृती दर्शनासाठी खुल्या केल्या आहेत. दरम्यान, घरगुती गणेशोत्सवाची सांगता शनिवारी होत असल्याने उर्वरित पाच दिवसांत तांत्रिक व सजीव देखाव्यांचे नियोजन सुरू आहे. kolhapur Ganesh Utsav

प्रतिवर्षी बहुतांशी सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणेशमूर्ती व देखाव्यांच्या प्रतिकृती घरगुती गणेश विसर्जनानंतर खुल्या होतात. मात्र, अलीकडे हा ट्रेंड बदलत असून मोठ्या व वैशिष्ट्यपूर्ण गणेशमूर्ती आणि देखाव्यांच्या प्रतिकृती पहिल्याच दिवशी खुल्या केल्या जात आहेत. त्यानुसार यंदाही बहुतांशी गणेशमूर्ती दर्शनासाठी खुल्या झाल्या आहेत. यात छत्रपती संभाजीनगर तरुण मंडळाची शाडूची गणेशमूर्ती, शाहूनगर मित्र मंडळाची फायबरची 21 फुटी मूर्ती, छत्रपती शिवाजी चौकाचा महागणपती व संयुक्त मंडळाची 21 फुटी गणेशमूर्ती, दिलबहार तालीम मंडळाचा दख्खनचा राजा, गोलसर्कल तरुण मंडळ, पूलगल्ली तालीम मंडळ, जुना बुधवार पेठ तालीम व भगतसिंग तरुण मंडळाची 21 फुटी गणेशमूर्ती, वाय. पी. पोवारनगर मित्र मंडळाचा 21 फुटी गणेश, गाईड मित्र मंडळाची ऑक्टोपसवर स्वार, डाव ग्रुप लक्ष्मीपुरीची मत्स्य रूपातील, पानलाईन गणेश मंडळाची पानांपासून तयार केलेली गणेशमूर्ती, सत्यनारायण तालीम मंडळाची विठ्ठलरूपी, घिसाड गल्ली, सोमवार पेठ तरुण मंडळाचा गरूडावर स्वार गणेशमूर्ती आदींचा समावेश आहे. kolhapur Ganesh Utsav

रविवार पेठ परिसर

येथे आकर्षक मूर्तीवर भर दिला आहे. पूलगल्ली तालीम मंडळाची आकर्षक मूर्ती खुली झाली आहे. अष्टसिद्धी प्रणित होलार समाज मित्र मंडळाने वराह अवतार रूपातील मूर्ती साकारली आहे. कोल्हापूर धान्य व्यापारी मंडळाची आकर्षक सजावटीसह लक्षवेधी मूर्ती आहे. kolhapur Ganesh Utsav

राजारामपुरी, उद्यमनगर परिसर

गणेशोत्सवात राजारामपुरी व उद्यमनगरमधील तरुण मंडळांकडून दरवर्षी देखाव्यांमध्ये आपले वेगळेपण जपले आहे. राजारामपुरी दुसरी गल्ली येथील राजारामपुरी शिवाजी तरुण मंडळाने यावर्षी कोईम्बतूर तामिळनाडू येथील आदि योगी ही 36 फुटांच्या मूर्तीची प्रतिकृती तयार केली आहे. लाईट इफेक्टस्द्वारे हा देखावा लक्षवेधी ठरणारा आहे.kolhapur Ganesh Utsav

न्यू फ्रेंडस् सर्कल राजारामपुरी सातवी गल्ली या मंडळाने बाल नामदेव विठ्ठल भक्ती हा तांत्रिक देखावा तयार केला आहे. यात आठ ते दहा मूर्ती असून हा देखावा आज, शुक्रवारपासून सुरू होणार आहे.kolhapur Ganesh Utsav

'चांद्रयान 3' ची यशस्वी मोहीम हा तांत्रिक देखावा उद्यमनगर येथील बालावधूत मंडळाने साकारला आहे. चंद्राची प्रतिकृती आणि लँडरद्वारे 'चांद्रयान 3' चे लँडिंग हे खास आकर्षण ठरणार आहे. तसेच जय शिवराय मित्र मंडळाने भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिकृती तयार केली आहे.kolhapur Ganesh Utsav

कलकल ग्रुपची 17 व्या शतकातील  ऐतिहासिक गणेशमूर्ती

मंगळवार पेठेतील कलकल ग्रुपने 17 व्या शतकातील ऐतिहासिक गणेशमूर्ती साकारली आहे. नेपाळमधील पांढरीदेवी काठमांडू व्हॅलीच्या मल्ल राजांची व त्यांच्या वंशजांची (इसवी सन 13 ते 18 वे शतक) ही संरक्षक देवता आहे. मूळ मूर्ती 19 इंच 48.3 सें.मी. इतकी आहे. ही मूर्ती ब्रम्हा, विष्णू, महेश आणि महादेवी यांचे चित्रण करणारी असून एका राखाडी दगडात तयार करण्यात आली आहे.kolhapur Ganesh Utsav

शाहूपुरीत चांद्रयान मोहिमेसह 'अमरनाथ', 'केदारनाथ'

गणेशोत्सवामध्ये यंदा शाहूपुरीतील मंडळांतर्फे कोल्हापूरकरांना चांद्रयान मोहिमेसह 'अमरनाथ', 'केदारनाथ' मंदिराचे दर्शन घडणार आहे. तर रविवार पेठ परिसरातील सार्वजनिक तरुण मंडळांनी आकर्षक मूर्तीवर भर दिला आहे. शाहूपुरीतील राधाकृष्ण तरुण मंडळाने यंदा केदारनाथ मंदिराची प्रतिकृती साकारली आहे. शाहूपुरी पहिल्या गल्लीत गणेश मंडळातर्फे अमरनाथ दर्शन घडविण्यात येणार आहे. यासाठी विशेष गुहा तयार केली आहे. शाहूपुरी युवक मंडाळाने चांद्रयान मोहीम हा तांत्रिक देखावा साकारला आहे. गणेश तरुण मंडळ यंदा क्रांती विरांगना या विषयावर सजीव देखावा साकारणार आहे. शिवनेरी मित्र मंडळ बालचमूंसाठी डिस्नेवर्ल्ड साकारणार आहे. याबरोबरच विविध तरुण मंडळांच्या आकर्षक मूर्ती लक्षवेधी आहेत. येथील बहुतांश देखावे शनिवारी अथवा रविवारी पाहण्यास खुले होणार आहेत.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news