कोल्हापुरातील ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण ठणठणीत | पुढारी

कोल्हापुरातील ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण ठणठणीत

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : आयटीआय परिसरातील कोल्हापुरातील पहिल्या ओमायक्रॉन बाधिताचा अहवाल निगेटिव्ह आला असून तो ठणठणीत बरा आहे, असे आरोग्य यंत्रणेने स्पष्ट केले. त्याचबरोबर त्याच्या कुटुंबातील सर्वांचे अहवालही निगेटिव्ह आल्याने यंत्रणेने सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.

संबंधित व्यक्तीच्या पत्नीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने 14 डिसेंबरला प्राप्त झाला होता. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर कुटुंबातील चौघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते.

यानंतर बुधवारी या कुटुंबातील एका व्यक्तीला ओमायक्रॉन झाल्याचे समोर आले. जिल्ह्यात पहिला ओमायक्रॉन रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली होती. त्याच्या बंगल्यासमोरील परिसर सील करण्यात आला.

आरटी-पीसीआर चाचणी निगेटिव्ह

गुरुवारी संबंधित व्यक्तीसह पत्नी, मुलगा, आई, भाऊ यांची आरटी-पीसीआर चाचणी करण्यात आली. या सर्वांचेच अहवाल निगेटिव्ह आले. तसेच सर्वांची प्रकृतीही ठणठणीत आहे.

कंटेन्मेंट झोन दोन दिवस

या व्यक्तीच्या बंगल्याचा परिसर कंटेन्मेंट झोन करण्यात आला असून खबरदारी म्हणून आणखी दोन दिवस परिसर सील ठेवला जाणार आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button