ऑस्ट्रेलियाचा ॲशेस मालिकेवर कब्जा ! पदार्पणवीर स्कॉट बोलंडने २१ चेंडूत ६ विकेट घेत इंग्रजांचे कंबरडे मोडले | पुढारी

ऑस्ट्रेलियाचा ॲशेस मालिकेवर कब्जा ! पदार्पणवीर स्कॉट बोलंडने २१ चेंडूत ६ विकेट घेत इंग्रजांचे कंबरडे मोडले

मेलबर्न; पुढारी ऑनलाईन

ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला एकहाती दणका देत ॲशेस मालिकेवर कब्जा केला आहे. तिसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा १ डाव १४ धावांनी पराभव करत मालिका खिशात घातली. पदार्पणवीर स्कॉट बोलंड ही मालिका स्वप्नवत झाली असून त्याने पहिल्याच कसोटीत त्याने डावात सहा विकेट्स घेतल्या.

बॉक्सिंग डे कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंडचा एक डाव आणि १४ धावांनी पराभव झाला. आणि उपाहारापूर्वी, ऑस्ट्रेलियाने ॲशेसमध्ये ३-० अशी अभेद्य आघाडी घेतली.

ऑस्ट्रेलियाने २६७ (हॅरिस ७६, अँडरसन ४-३३) इंग्लंड १८५ (जो रूट ५०, पॅट कमिन्स ३-३६, नॅथन लियॉन ३-३६) आणि ६८ (स्कॉट बोलंड ६-७, मिचेल स्टार्क ३-२९) एक डाव आणि १४ धावांनी पराभूत केले.

ऑस्ट्रेलियाच्या विजयात त्यांच्या वेगवान गोलंदाजांची ताकद दिसून आली. स्कॉट बोलंडने ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या दिवशी अवघ्या तीन चेंडूत दोन विकेट्स मिळवून दिलेली आघाडी अबाधित राहिली.

यानंतर तिसऱ्या दिवशीही त्याने दमदार खेळ सुरू ठेवला. त्याने अवघ्या २१ चेंडूत सहा विकेट घेतल्या. हे त्याचे घरचे मैदान आहे आणि त्याच्या कामगिरीने हे दाखवून दिले आहे की त्याला हे मैदान चांगलेच माहीत आहे. त्याने इंग्लंडला एकापाठोपाठ एक धक्के दिले.

मिचेल स्टार्कने ३१ धावांत चार बळी घेतले. त्याने दिवसाच्या सुरुवातीलाच अप्रतिम चेंडू टाकून बेन स्टोक्सला बाद केले. पण हा दिवस पूर्णपणे स्कॉट बोलंडच्या नावे राहिला. त्याने इंग्लंडच्या पहिल्या डावात ४८ धावांत एक विकेट घेतली पण दुसऱ्या डावात तो वेगळ्याच पातळीवर गोलंदाजी करत होता. त्याने इंग्लंडच्या आत्मविश्वासाला सतत तडाखा दिला.

हे ही वाचलं का ?

Back to top button