Hemangi Kavi : ‘वाहियात कमेंट करणारे फालतू लोक लवकर बरे व्हावेत’

hemangi kavi
hemangi kavi
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क

आपल्या जोडीदाराला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन अभिनेत्री हेमांगी कवी (Hemangi Kavi) चर्चेत आली. तिची चर्चा झाली ती तिच्या फोटो पोस्टची. खूप इमोशनल पोस्ट लिहून तिने आपल्या पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर तिने आणखी एक फोटो पोस्ट केला आहे. इन्स्टाग्रामवर हा फोटो शेअर करत तिने (Hemangi Kavi) एक पोस्ट लिहिलीय. हेमांगी कवीने तिच्या पोस्टमध्ये काय म्हटलंय पाहूया.

ती म्हणते-

आमच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त तुम्ही दिलेल्या #शुभेच्छा, #शुभचिंतन, #प्रेम, #आशिर्वादासाठी तुम्हां सर्वांचे खूप खूप #धन्यवाद! असंच प्रेम राहू द्या!

Thank you All! Keep loving! ❤️

काही लोकांनी दुष्ट, वाहियात comments केल्या पण त्यांची विचारसरणीच तशी असेल तर कुणी काहीच करू शकत नाही! ते लवकर बरे व्हावेत एवढीच इच्छा!

पण तरीही त्या comments वाचून आम्ही खूप हसलो, So… त्यांना माफी! जाओ तुम भी क्या याद रखोगे!☺️

@sandeepdhumal76 #आमचामाणूस #हमाराआदमी #postweddinganniversarypost #thankyouall

तिने तिला लग्नाच्या वाढदिवसाच्या मिळालेल्या शुभेच्छांना धन्यवाद दिले आहेत. त्याचबरोबर, ज्यांनी तिला फालतू, वाईट कमेंट केल्या. त्यांना तिने माफी तर दिलीच. शिवाय खडेबोलदेखील सुनावले आहेत.

फालतू कमेंट करणाऱ्या लोकांचे विचार आम्ही बदलू शकत नाही. त्यामुळे आम्ही काहीचं करू शकत नाही, असे कवीने पोस्टमध्ये म्हटलं आहे. तसेच तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केलाय. यामध्ये ती एका स्विमिंग पूलच्या शेजारी मस्तीच्या मूडमध्ये असलेली दिसते. व्हिडिओ पोस्ट करत तिने कॅप्शनमध्ये लिहिलंय-

And v skipped to d good destination for r 13th #weddinganniversary #celebration at #beautiful @kalanganfarms Alibaug.

ती आपल्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त अलिबाग येथे गेलेली दिसते. तिचा हा १३ वा लग्नाचा वाढदिवस होता.

पहिल्या पोस्टमध्ये काय लिहिलं होतं-

लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! 

या वर्षांपासून आपल्या लग्नाला किती वर्षे झाली बोलून वर्ष मोजायची नाहीत तर प्रत्येक क्षण जगायचा! एकमेकांना सहन करत आलो वगैरे तर मुळीच म्हणणार नाही कारण आपल्याला माहितेय आपणकसे आहोत आणि काय आहोत एकमेकांसाठी आणि हे माहीत असणंच जास्त महत्वाचं आहे. आपल्या संसाराच्या सुरवातीच्या काळात माझं चिडणं तुझं कमालीचं शांत असणं, मी अति romantic तू unromantic असणं, मी अति practical तू तेवढाच emotional असणं, मी चेंगुस तू खर्चिक असणं. इतक्या वर्षाच्या सहवासमुळे आपल्यातली ही विसंगती सुसंगतीत बदल्याचं श्रेय आपल्या दोघांचं! कुठल्याही परिस्थितीत एकमेकांची साथ सोडायची नाही हे इतक्या वर्षात आपल्याला जमलंय, या पुढे ही जमवू तेवढा समंजसपणा दोघांना ही लाभो!

आतापर्यंत आपल्या दोघांच्याही आयुष्यात मोहाचे क्षण आले असतील, पुढे ही येतील पण तरीही त्या उपर जाऊन आपण एकमेकांना निवडलंय आणि निवडू कुठल्याही आसक्ती शिवाय यातच आपल्या प्रेमाचं, संसाराचं यश आहे. एकमेकांना जिंकल्याचं प्रतीक आहे.
एकमेकांशिवाय राहू शकत नाही ते आता… एकमेकांना सोडू शकत नाही दिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा! ☺️

भांडत राहू, वाईट परिस्थितीशी झगडत राहू, आनंदी राहू, समाधानी राहू!

@sandeepdhumal76 ❤️ #हमाराआदमी #आमचामाणूस #happyanniversary #25thdecember

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news