कोल्हापूर : कोरोना का नियंत्रणात नाही? राजेश टोपे म्हणाले… | पुढारी

कोल्हापूर : कोरोना का नियंत्रणात नाही? राजेश टोपे म्हणाले...

कोल्हापूर; पुढारी ऑनलाईन : कोरोना लसीचे दोन डोस घेतल्यानंतर सुद्धा कोरोनाचा संसर्ग होत आहे.  अशा कोरोना केससमध्ये सगळ्या डेटाचा अभ्यास सुरू आहे. व्हायरस म्युटेड झालाय का? याचाही अभ्यास सुरू आहे. अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

अधिक वाचा :

आरोग्यमंत्री राजेश टोपे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

कोरोनाचे लवकरात लवकर निदान होणे गरजेचे आहे. त्यामुळे टेस्ट व्हायला हव्यात. काही टेस्ट गरजेच्या आहेत त्या व्हायलाच हव्यात. पण विनाकारण सिटी स्कॅन करू नये, अशा सूचना त्यांनी केल्या आहेत.

कोल्हापुरात जनजागृतीची गरज…

कोल्हापूरमधील कोरोनाच्या परिस्थितीबाबत बोलताना ते म्हणाले की, लोकांत जनजागृती व्हायला हवी. त्यासाठी कोल्हापूरच्या कलेक्टरनी प्रयत्न करावेत.

दुसऱ्या लाटेत २८ टक्क्यांनी पॉझिटिव्हिटी वाढली. पण ही आकडेवारी इतर जिल्ह्यांत तुलनेत ठीक आहे. अधिक संसर्ग असलेल्या जिल्ह्यांत लसीकरणाला प्राधान्य दिले जाईल.

अधिक वाचा :

ऑक्सिजनचे १७ प्लांट लवकर सुरु होणार…

तिसरी लाट आली तर साडेचार मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज भासणार आहे. त्यासाठी ऑक्सिजनचे १७ प्लांट लवकरात लवकर सुरु करण्यात येतील. मागच्या वेळी ५०० नवीन रुग्णवाहिका घेतल्या.

गट क आणि ड मध्ये १० हजार पदांची भरती…

आणखी ५०० नवीन रुग्णवाहिका घेण्याला मंजुरी दिली आहे. २०५ कोटी रुपये ऑक्सिजनसाठी ठेवलेत. मागच्या आठवड्यात एक हजार डॉक्टरांची भरती केली आहे. अजून भरती केली जाणार आहे. गट क आणि गट ड मध्ये १० हजार पदे परीक्षा घेऊन भरणार आहे. ६० हजार आशा वर्कर्संना पगारवाढ होणार आहे. अशी माहिती टोपे यांनी दिली आहे.

अधिक वाचा :

मृत्यूदर कमी करण्याकडे कल असेल. केंद्राकडे ऑक्सिजनची मागणी मुख्यमंत्र्यांनी केली आहे. पंतप्रधानांनी गर्दी न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. असेही आरोग्यमंत्री टोपे म्हणाले.

हे ही वाचा :

आरोग्यमंत्री राजेश टोपे live :कोल्हापूर जिल्हा कोरोना आढावा 

Back to top button