महाडिकांनंतर सतेज पाटलांची बिनविरोध निवडीची वाटचाल | पुढारी

महाडिकांनंतर सतेज पाटलांची बिनविरोध निवडीची वाटचाल

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा ; अटीतटीच्या राजकारणात जिल्ह्यात पुन्हा 18 वर्षांनंतर विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध झाली. 2003-04 साली माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी विधान परिषदेची दुसरी टर्म बिनविरोध करत बाजी मारली होती. यंदाच्या निवडणुकीत मात्र महाडिकांचे कट्टर प्रतिस्पर्धी पालकमंत्री सतेज पाटील यांच्याविरोधात माजी आमदार अमल महाडिक यांनी माघार घेतली. सतेज पाटील यांनीही महाडिक यांच्याप्रमाणेच विधान परिषदेची दुसरी टर्म बिनविरोधात पार केल्याने राजकारणाचे एक चक्र पूर्ण झाल्याची चर्चा आहे.

1995 साली विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर महादेवराव महाडिक यांनी जोरदार कमबॅक करत 1997 साली काँग्रेसच्या अधिकृत विजयसिंह यादव यांचा पराभव केला होता. त्यानंतर महाडिक यांची दुसरी टर्म बिनविरोध झाली. काँग्रेसच्या उमेदवारीवर महाडिक यांनी 2003 ची निवडणूक बिनविरोध जिंकली.

त्यानंतर 2009च्या निवडणुकीत त्यांनी प्रा.जयंत पाटील यांचा पराभव केला. त्यानंतर 2014 च्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर पाटील यांनी विधान परिषद लढविली. 2015च्या निवडणुकीत सतेज पाटील यांनी काँग्रेसची उमेदवारी खेचून
आणली.बंडखोरी केल्यानंतर महाडिक यांना 63 मतांनी पराभव स्वीकारावा लागला. 2003 ची पुनरावृत्ती होऊन 2021 च्या निवडणुकीत अमल महाडिक यांनी माघार घेतल्याने पाटील यांची बिनविरोध निवड झाली.

Back to top button