कॅटरीना कैफ विकी कौशल यांचे ‘या’ दिवशी शुभमंगल! | पुढारी

कॅटरीना कैफ विकी कौशल यांचे ‘या’ दिवशी शुभमंगल!

मुंबई : पुढारी ऑनलाईन

बॉलिवूडसह सर्व सिनेरसिक आणि तमाम भारतियांना कॅटरीना कैफ आणि विकी कौशल कोणत्या दिवशी लग्न करतात याची उत्सुकता होती. अखेर ती उत्सुकता आता त्या दोघांनी फार काळ थांबवून ठेवली नाही. यांचे लग्न होणार होणार म्हणत आता त्यांनी डिसेंबर मध्ये लग्न करण्याचे फायनल केले असून दोघे तयारीला लागले आहेत.

अभिनेता राजकुमार राव यांच्या विवाहनंतर सर्वांना कॅटरीना कैफ हिच्या विवाहाची प्रतिक्षा होती. गेली दोन तीन महिने या महिन्यात दोघे लग्न करतील त्या महिन्यात लग्न करतील फक्त याच बातम्या येऊन धडकत होत्या. पण, नक्की काही ठरत नव्हंत. अर्थात मोस्ट हॉट ॲन्ड ग्लॅमरस असणाऱ्या या कपलने आपल वेडिंग तितक्याच स्टाईलीश पद्धतीने व्हावं असंच योजलं असेल. पण आता ती प्रतिक्षा संपली असून कॅटरीना आणि विकी कौशल दोघेही लग्नाच्या तयारीला लागले आहेत. हा शानदार विवाह सोहळा राजस्थान येथील एका आलिशान किल्ल्यावर होणार आहे.

कॅटरिना कैफच्या जवळील सूत्रांकडून ही बातमी माध्यमांकडे पोहचली आहे. त्यानुसार ही अगदी पक्के आहे कॅटरिना आणि विकी ने स्पेशल डेस्टीनेशन वेडिंग हे राजस्थान सारख्या ठिकाणी करण्याचे योजले आहे. त्यानुसार दोघांनी विमानांचे बुकींग आणि तेथील पाहुण्यांचा पाहुणचार करण्यासाठीची सर्व तयारी सुरु केली आहे. राजस्थान येथील सवाई माधवपूर येथील सिक्स सेन्सेस फोर्ट बारवरा येथील रिसॉर्टमध्ये हा भव्य विवाह सोहळा संपन्न होणार आहे. बॉलिवूड मधील नामांकीत २०० सेलिब्रिटींच्या उपस्थितीत राहतील असा अंदाज वर्तविला जात आहे.

कॅटरिना कैफ आणि विकी कौशल ९ डिसेंबर रोजी विवाह बंधनात अडकणार आहेत. तसेच ७ आणि ८ डिसेंबर रोजी संगीत आणि मेहंदीचे कार्यक्रम असणार आहेत. या सर्व कार्यक्रमांना बॉलिवूडमधील कलाकार उपस्थित असणार आहे. तसेच बॉलिवूड मधील मोठ्या घराण्यांना या दोघांच्या पत्रिका देखिल पोहचल्या आहेत. करण जोहर, अली अब्बास जफर, कबीर खान, मीनी माथुर, रोहित शेट्टी, सिद्धार्थ मल्होत्रा, कियारा अडवाणी, वरुण धवन, अजय देवगन, अमिर खान, शाहरुख खान, अक्षय कुमार, दिपिका पदुकोन, रणवीर सिंह, रणबीर कपूर, आलिया भट हे दिग्गज या सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.

सलमान खानची अनुपस्थिती

कॅटरिना कैफ आणि सलमान खान हे समिकरण अवघ्या बॉलिवूडला माहित आहे. कॅटरिना कैफ बॉलिवूडमध्ये सलमान खानमुळे स्थिरावली आणि मोठी अभिनेत्री झाली. सलमान खानसह त्याच्या कुटुंबियांनी देखिल कॅटरिना कैफची खूप काळजी घेतली. तसेच तीला आपल्या कुटुंबात सदस्यांचे स्थान दिले. इतकी वर्षे सलमान खान आणि कॅटरिना कैफ कधी लग्न करतात अशी चर्चा चालायची. पण अखेर त्या सर्व अफवा ठरल्या. रणबीर कपूर बरोबर बिनसल्यावर अनेक वर्षांनी तीचे नाव विकी कौशल सोबत जोडले गेले. अखेर दोघांनी प्रेमाची कबुली देत लग्न करण्याचे निश्चित केले.

कॅटरिना कैफ आणि विकी कौशलच्या लग्नाची पहिली पत्रिका अर्थातच सलमान खान यांच्या कुटुंबियांना देण्यात आली होती. पण, सुत्रांच्या माहिती नुसार या लग्नास सलमान खान सहित त्याचे कुटुंबिय उपस्थित राहणार नाहीत. सलमान खान सध्या त्याच्या अंतिम या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. शिवाय टायगर ३ या आगामी चित्रपटात सलमान सोबत कॅटरिना देखिल दिसणार आहे. या चित्रपटाचे शुटींग रशियामध्ये सुरु होते. मात्र कॅटरिनाच्या लग्नासाठी शुटींग थांबवून सर्व टिम भारतात परतली आहे.


 

Back to top button