कोल्हापूर : अवघ्या चार महिन्यांपूर्वी आई वडिलांचा मृत्यू, आज मुलावरही अपघाताने काळाचा घाला | पुढारी

कोल्हापूर : अवघ्या चार महिन्यांपूर्वी आई वडिलांचा मृत्यू, आज मुलावरही अपघाताने काळाचा घाला

बानगे (कोल्हापूर) : पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर बानगे : निपाणी-राधानगरी मार्गावर गुरुवारी सकाळी नऊ वाजता सोनगे (ता. कागल) येथे सोनगे येथील युवक टेम्पोच्या धडकेत जागीच ठार झाला. किरण अनंत वडेर (वय ३५) असे मृत तरुणाचे नाव आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी कि, टेम्पो (नंबर एम. एच.१२ जे. एफ. ०९१९) चा चालक पांडुरंग दगडू पाटील (रा. कासारपुतळे) हा निपाणीकडून भाजीपाला घेऊन कसबा तारळेकडे जात होत.

टेम्पोचा ताबा सुटल्यामुळे टेम्पोने किरणला जोराची धडक देऊन सुमारे पन्नास फूट फरफटत नेले. घटनेची माहिती पोलीस पाटील सतीश तिराळे यांनी मुरगूड पोलीस स्टेशनला तत्काळ कळवली.

आई व वडील चार महिन्यापूर्वी आजारपणामुळे मयत

किरण एकुलता एक व तो अविवाहित होता. त्याचे आई व वडील चार महिन्यापूर्वी आजारपणामुळे मयत झाले आहेत. तो एकटाच उदरनिर्वाह करत होता. दरम्यान त्याचाही अपघातात मृत्यू झाला.

मुरगूड पोलीस स्टेशनचे अधिकारी संजय चव्हाण यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

मृतदेह मुरगूड ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदन करण्यासाठी नेण्यात आला.

टेम्पो चालक घटना घडल्यानंतर घटना स्थळावरून पळून गेला. पुढील तपास मुरगूड पोलीस करीत आहेत.

Back to top button