

हुपरी; पुढारी वृत्तसेवा : चांदीचा दर दिवसेंदिवस गगनाला भिडले जात आहेत, त्यामुळे चांदीचे दागिणे खरेदी करणाऱ्या ग्राहकांना आपल्या इच्छाना मुरड घालावाे लागत आहे. पाय भरून पैंजण घालायची हौस असणाऱ्या युवतींना पंधरा वीस ग्रामच्या नाजूक पैंजणावर हौस भागवावी लागत आहे. अशावेळी एखादी युवती लाखाच्या किमतीचे व ते ही सव्वा किलो वजनाचे पैंजण घालत असेल तर चर्चा तर होणारच!
संबधित बातम्या
हुपरी येथील तरुण उद्योजकांला एका व्यापाऱ्याकडून सव्वा किलो पैंजणाची ऑर्डर आली आहे. याबाबत त्यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, सर्व साधारण लग्नात घातले जाणारे पैंजण २५० ते ३०० ग्राम वजनाचे असतात. पण एवढ्या मोठ्या वजनाचे पैंजण तयार करण्याचे आवाहन होते. तरीही ते आवाहन आम्ही पेलले. त्यासाठी आमच्या कारगिरानी महिना भर परिश्रम घेऊन पैंजण तयार करून ऑर्डर पूर्ण केली आहे. १२५० ग्रामच्या पैंजणाची आजचा भाव पकडला तर सर्वसाधारणपणे मजुरीसह एक लाखाहून अधिक किंमत होते.
नववधूला सध्या २५० ते ३०० ग्रामच्या वजनाचे पाय भरून पैंजण घालायची प्रथा वाढत आहे. त्यात अशा हौसी पालकांनी आपल्या मुलगी, सुनेला अशा प्रकारे जाड व भरगच्च पैंजण घालण्याची प्रथा वाढत आहे.
हेही वाचा :
प्रिवेडींगप्रमाणे लग्नात नववधूला चांदीचा कमरपट्टा, छल्ला, मेखला तसेच पैंजण मोठमोठे घालण्याची प्रथा रुजत आहे. याशिवाय आहेरात चांदीची भांडी भेट देण्याची क्रेज दिवसेंदिवस वाढत आहे. चांदीच्या दागिन्यात गुंतवणूक म्हणून ही जादा वजनाचे पैंजण घेण्याकडे कल वाढत आहे. गरजेच्या वेळी पैंजण घालून हौस भागल्यावर विकून गरज ही भागवता येते. त्यामुळे चांदी उद्योगाला अच्छे दिन येण्याची लक्षणे आहेत.
-मोहन खोत (अध्यक्ष हुपरी चांदी हस्तकला उद्योग विकास फाऊंडेशन )