कोल्हापूर : गणपती विसर्जनासाठी गेलेल्या युवकाचा कृष्णा नदीत बुडून मृत्यू | पुढारी

कोल्हापूर : गणपती विसर्जनासाठी गेलेल्या युवकाचा कृष्णा नदीत बुडून मृत्यू

कुरुंदवाड : पुढारी वृत्तसेवा : राजापूर (ता.शिरोळ) येथे गणपती विसर्जनासाठी गेलेल्या युवकाचा कृष्णा नदीत बुडून मृत्यू झाला. विनायक रुक्मन्ना आवटी (वय ४०) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (दि.२६) रोजी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास घडली.

संबधित बातम्या 

राजापूर येथील गणेश मंडळाच्या गणपतीची मिरवणूक झाल्यानंतर राजापूर बंधारा येथे कृष्णा नदीत गणपती विसर्जनासाठी काही युवक गेले होते. गणपती नदीत विसर्जन करत असताना विनायक आवटी याचा तोल गेल्याने तो नदीत पडला. विनायकने आरडाओरडा केल्यानंतर त्याच्या बचावासाठी १० ते १२ युवकांनी नदीत उडी मारून त्याला पाण्याबाहेर काढले.

यानंतर विनायकला उपचारासाठी शिरोळ येथील शताय रुग्णालयात आणले असता तेथील डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केलं. या अचानक घडलेल्या घटनेने राजापूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

हेही वाचा : 

Back to top button