एकही नदी नसलेल्या दुबईत वीज येते कुठून?

एकही नदी नसलेल्या दुबईत वीज येते कुठून?
Published on
Updated on

दुबई : जगभरातील सर्वात सुंदर शहरांपैकी एक शहर म्हणजे दुबई. संयुक्त अरब अमिरातीत हे शहर वसलेले आहे. दुबईत जगातील सर्वात मोठी इमारत आहे, एकापेक्षा एक टोलेजंग मॉल्स, घरे, कारखाने आहेत. पण, येथे एकही नदी नसल्याने या इतक्या मोठ्या शहराला वीजपुरवठा होतो तरी कुठून, असा प्रश्न मनात उपस्थित झाल्याशिवाय राहणार नाही आणि कोरा या वेबसाईटवर नेमक्या याच मुद्याला हात घातला गेला आहे.

कोरा या सोशल मीडिया साईटवर नेटिझन्स सातत्याने एकापेक्षा एक असे जटिल प्रश्न विचारून आपले शंका समाधान करून घेत असतात. यातच एका युझरने दुबईतील वीज पुरवठ्याशी संबंधित प्रश्न विचारला. दुबईत कोणतीही नदी नाही. धरण नाही आणि या शहराला मोठ्या प्रमाणात वीज लागते. वीज निर्मितीसाठी तर पाण्याची प्रचंड आवश्यकता असते आणि दुबईत नदीच नाही. याचे उत्तर असे आहे की, संपूर्ण संयुक्त अरब अमिरातच यासाठी मोठ्या प्रमाणात औष्णिक उर्जेवर अवलंबून असते. 2021 मध्ये एकूण वीजेपैकी
92.6 टक्के वीज याच माध्यमातून पुरवली गेली आहे.

आता कोरा वेबसाईटवर युझर्सनी वेगवेगळे आडाखे मांडले. वीजनिर्मितीसाठी टर्बाइन फिरवण्याची आवश्यकता असते. ज्या माध्यमातून टर्बाइन फिरते, ते पाण्याशिवाय डिझेल, सीएनजी, पीएनजी, कोळसा व अगदी अलीकडे युरेनियमचे पर्याय असतात, असे एका युझरने म्हटले. हवेपासून वीजनिर्मिती करणारे टर्बाइन सर्वत्र उपलब्ध असू शकत नाहीत. हवेमुळे टर्बाइन ब्लेड फिरू लागतात, त्यावेळी चुंबक, तांब्याची प्लेट चौफेर फिरू लागतात आणि त्यातून इलेक्ट्रॉनचा प्रवास सुरू होतो, असेही या युझरने पुढे नमूद केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news