

पुढारी ऑनलाइन डेस्क : Flag Hoisting : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूरमध्ये ध्वजारोहण करण्यात आले. सूर्य-चंद्र असेपर्यंत तिरंगा डौलत राहो अशी प्रार्थना करतो असे म्हणत जगभरातील भारतीयांना आणि महाराष्ट्राच्या नागरिकांना अमृतकालातील स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. देशात आज हर घर तिरंगा, मेरी माटी मेरा देश या अभियानांमुळे सन्मानाची भावना तयार होत आहे. तसेच पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वात देशाचा आणि महाराष्ट्राचा विकास सुरू आहे, असे फडणवीस यावेळी माध्यमांशी बोलताना म्हणाले.
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वात देश आणि महाराष्ट्राचा विकास सुरू आहे. तसेच शेवटच्या माणसाचे स्वप्न पूर्ण करण्याचे विकासाकडे जाण्याचे आमचे प्रयत्न आहेत. प्रत्येकाच्या घराचे स्वप्न पूर्ण व्हावे.
यावेळी गडचिरोलीच्या पोलिसांना देशात सर्वाधिक शौर्य पदके मिळाली याविषयी प्रश्न विचारले असता फडणवीसांनी गडचिरोली पोलिसांच्या अतुलनीय शौर्य, धीर आणि प्रयत्नाचे कौतुक केले. गडचिरोलीच्या पोलिसांना जम्मू-काश्मीर पेक्षा जास्त पदके मिळली. गडचिरोलीच्या पोलिसांच्या अतुलनीय शौर्याबद्दल-धीरोदत्त कार्याबद्दल 32 पदके मिळाली. तसेच 26 जानेवारीला देखील अनेक पदके त्यांनी मिळवली होती. दोन्हींचा विचार करता गडचिरोली पोलिसांनी वर्षभरात एकूण 64 पदके मिळवली आहेत. गडचिरोली पोलिसांचे धैर्य-शौर्य आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी गडचिरोली पोलिसांना पुरस्कार मिळाले. मात्र, अजून संघर्ष सुरू आहे. भटकलेला एकही व्यक्ती शिल्लक आहे तोपर्यंत त्यांना मुख्य धारेत आणायला हवे, तोच आमचा प्रयत्न आहे. त्याकरिता पोलिसांना अहोरात्र सजग राहावे लागणार आहे. त्यामुळे निश्चितपणे गडचिरोली पोलिस आणि महाराष्ट्र पोलिस सजग राहतील.
गडचिरोलीतील सर्व गावकरी आणि स्थानिक रहिवासी हे देशासोबत आणि महाराष्ट्रासोबत आणि पोलिसांसोबत आहेत. नक्षलवाद्यांकडे माणसे नाहीत. त्यांच्याकडे जी माणसे आहेत ती परराज्यातून आलेली आहेत. आपल्या राज्यातून आता कोणाचीही साथ नक्षलवाद्यांकडून मिळत नाही. पोलिस नक्षलवाद्यांचा अत्यंत शौर्याने सामना करत आहेत.
हे ही वाचा :