कोल्हापूर : लोकसभा, विधानसभा निवडणुकीत पक्षनिष्ठा दाखवून द्या : राजीव आवळे

कोल्हापूर : लोकसभा, विधानसभा निवडणुकीत पक्षनिष्ठा दाखवून द्या : राजीव आवळे

कुरुंदवाड; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अनेकांना आमदार, खासदार म्हणून निवडून आणून पदे दिली. मात्र अनेकजण सत्तेच्या हव्यासापोटी त्यांनी राष्ट्रवादी पक्षाची निष्ठा सोडून जातीयवादी पक्षाबरोबर गेले. हे पक्षासाठी दुर्दैव आहे. येणाऱ्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत त्यांना जनतेने जाब विचारला पाहिजे, असे प्रतिपादन हातकणंगल्याचे माजी आमदार राजीव आवळे यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पाठिंबा देण्यासाठी येथील शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा टेनिस क्लब येथे मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष व्ही.बी. पाटील होते. शहर अध्यक्ष तानाजी आलासे, नितीन जांभळे, मदन कारंडे, आर. के. पवार, अनुसूचित जाती-जमाती सेलचे तालुकाध्यक्ष संदीप बिरणगे आदी. प्रमुख उपस्थित होते.

यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष पाटील म्हणाले, शरद पवार यांनी निवडणुकीच्या काळात ऊन, वारा, पाऊस कशाचीही तमा न बाळगता राज्यभर फिरून अहोरात्र प्रचार करून या आमदार, खासदारांना निवडून आणले. मात्र सत्तेच्या हव्यासापोटी ते जातीयवादी पक्षाच्या तंबूत दाखल झाले आहेत. शरद पवारांच्या वादळात हा तंबू नेस्तनाबूद झाल्याशिवाय राहणार नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी स्वागत शहराध्यक्ष तानाजी आलासे यांनी केले. तर प्रास्ताविक बाबल पवार यांनी केले. यावेळी माजी आमदार राजीव आवळे, जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील व इतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

या मेळाव्याला बबलू पवार, बंडू खराडे, दिलीप बंडगर, सद्दाम तहसीलदार, सुनील कांबळे, संगीता वसमाने, राजू कांबळे, अरुण भंडारे, विजय गायकवाड, अशोक बिरणगे, दिनेश कांबळे व सर्व सेलचे पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news