

गडहिंग्लज : संततधार पावसाने पाण्याखाली गेलेला गडहिंग्लज तालुक्यांतील महत्त्वाचा भडगाव पूल आज (मंगळवार) पहाटे वाहतुकीस खुला झाला. तर पूर्व भागातील जरळी बंधार्यावरील पाणी कमी झाल्याने त्यावरील वाहतुकही सुरळीत झाली. हे दोन्ही मार्ग सुरु झाल्याने चंदगड राज्य मार्गासह तालुक्याच्या पूर्व भागातील गावांतील दळणवळण पूर्ववत झाले आहे.
रविवारी रात्री नऊ वाजता भडगाव पूल तर सोमवारी सकाळी जरळी बंधारा पाण्याखाली गेला होता. यामुळे तालुक्याच्या पूर्व भागासह चंदगड मार्गावरील गावे संपर्कहीन झाली होती. सोमवारी पावसाचा जोर कमी राहिला. मात्र पाणीपातळी अतिशय संथ गतीने उतरत होती. आज पहाटे दोन्ही ठिकाणे वाहतुकीसाठी खुली झाली.
दरम्यान हिरण्यकेशी नदीवरील ऐनापूर, निलजी, घटप्रभा नदीवरील कानडेवाडी हे बंधारे सहा दिवसांपासून पाण्याखालीच आहेत. त्यामुळे या मार्गांवरील वाहतूक पर्यायी मार्गाने सुरु आहे. एसटी वाहतूक सुरु झाल्याने शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी, नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
हेही वाचा :