कोल्हापूर : पूर बाधित क्षेत्रातील नागरिकांनी स्थलांतरित व्हावे; जिल्हा प्रशासनाचे आवाहन

कोल्हापूर : पूर बाधित क्षेत्रातील नागरिकांनी स्थलांतरित व्हावे; जिल्हा प्रशासनाचे आवाहन

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : पंचगंगेच्या पाणी पातळीत अत्यंत संत गतीने वाढ होत असली, तरी ती धोक्याच्या पातळीकडे जात आहे. पंचगंगेची पाणी पातळी ५२ फूट झाल्यानंतर ज्या ज्या भागात पाणी येते त्या त्या भागातील नागरिकांनी आत्तापासूनच स्थलांतरित व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

पंचगंगेची पाणी पातळी सध्या ४०.५ फूट इतकी असून धोका पातळी ४३ फूट आहे. राधानगरी धरण ९४ टक्के भरले आहे. पावसाचा जोर राहिला, तर रात्री उशिरा धरण भरण्याची शक्यता आहे. यामुळे धरणातून विसर्ग सुरू होण्याची शक्यता असल्याने पाणी पातळीत वाढ होऊ शकते. त्यामुळे संबंधित नागरिकांनी सुरक्षित स्थळी जावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news