बालिंगे पुलाला धोका; कोल्हापूर- गगनबावडा रस्त्यावरील वाहतूक पूर्णतः बंद | पुढारी

बालिंगे पुलाला धोका; कोल्हापूर- गगनबावडा रस्त्यावरील वाहतूक पूर्णतः बंद

दोनवडे; पुढारी वृत्तसेवा : आज सकाळी ८ वाजल्यापासून पुन्हा पोलीस प्रशासनाने व राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बालिंगे येथील भोगावती रिव्हज पुलाला धोका असल्याने दोनवडे ते बालिंगे दरम्यानची वाहतूक पूर्णतः बंद केली आहे. सुरक्षेच्या कारणावरून दोनवडे व बालिंगे येथे बॅरॅकेट्स उभा करून रस्ता बंद केला आहे. त्यामुळे पूर्व सुचना न देता रस्ता बंद केल्याने प्रवाशांमधून संताप व्यक्त होत आहे.

बालिंगे पुलाच्या दोन्ही बाजूला वाहने थांबवली आहेत. त्यामुळे काही लोक पायी चालत जात आहेत. दोन्ही बाजूला मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बालिंगे रिव्हज पुलाला धोका असल्याने पूल बंद करण्यात आला आहे, अशा सुचना पोलिस प्रशासनाकडून दिल्या जात आहेत.

भोगावती नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. बालिंगा पुलाची मच्छिंद्री होणार असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी परिस्थितीचा आढावा न घेताच राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना हा रस्ता बंद करण्यासाठी सूचना केल्या आहेत. आठ वाजण्यापूर्वी या मार्गावरून दुचाकी व चार चाकी वाहने ये-जा करण्यास सुरू होती. पण ८ वाजल्यानंतर पोलीस प्रशासनाचे कर्मचारी बालिंगे महादेव मंदिर येथे व साबळेवाडी फाटा येथे बॅरॅकेट्स लावून बंदोबस्तात आहेत. येथून दुचाकी व चार चाकी वाहनांना सोडले जात नसल्याने नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा : 

Back to top button