आजरा : गव्याच्या धडकेत महिला जखमी | पुढारी

आजरा : गव्याच्या धडकेत महिला जखमी

आजरा; पुढारी वृत्तसेवा : पेरणोली (ता. आजरा) येथे शेतात काम करत असताना गव्याने महिलेला धडक दिली. शालन विष्णू दारूडकर (वय ५०) असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. ही घटना रविवारी (दि.१८) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली.

याबाबत अधिक माहिती अशी, दारूडकर या सहा-सात महिलांसह सकाळी आपल्या शेतात भांगलणी साठी केल्या होत्या. शेतातील काम दुपारी काम आवरल्यानंतर त्या गावाशेजारील शिवारातील दुसऱ्या शेतात महिलांसह भांगलण करीत होत्या. दुपारी चार वाजण्याच्या सुमारास कुरकुंदेश्वर देवालयानजिकच्या शेतातून १०-१२ गव्यांचा कळप शिवारात दाखल झाला.

या कळपातील एका गव्याने दारूडकर यांच्यावर हल्ला केला. यामुळे दारूडकर या तोंडावर पडून बेशुध्द झाल्या. त्यामुळे तातडीने उपचारासाठी आजरा ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. आजरा परिक्षेत्र वनाधिकारी स्मिता डाके, वनपाल बाळेश न्हावी यांनी जखमीची विचारपूस केली.

हेही वाचा;

Back to top button