तारदाळमध्ये कोरोचीच्या तरुणाचा निर्घृण खून

तारदाळमध्ये कोरोचीच्या तरुणाचा निर्घृण खून
Published on
Updated on

हातकणंगले तालुक्यातील तारदाळ येथील प्राईड इंडिया औद्योगिक वसाहतीजवळ तरुणाचा निर्घृण खून करण्यात आल्याची घटना आज पहाटे उघडकीस आली. संदीप शांताराम घट्टे (वय ३२ रा. धनगर माळ कोरोची ) असे त्याचे नाव आहे. तो हमाली काम करीत होता. इचलकरंजी शहर परिसरातील आठवड्यातील हा दुसरा खून असल्याने शहर परिसर पुन्हा एकदा हादरले आहे. मारेकऱ्यांच्या शोधासाठी पोलिसांची तीन पथके रवाना झाली आहेत.

तारदाळ येथील प्राइड इंडिया औद्योगिक वसाहत व सांगले मळ्याकडे जाणाऱ्या मार्गावर पहाटे चारच्या सुमारास कामावरून घराकडे परत जाणाऱ्या कामगारांना रस्त्यात तरुण पडल्याचे दिसले. त्यांनी  तत्काळ शहापूर पोलिसांना या घटनेची माहिती कळवली. शहापूर पोलिस घटनास्थळी येऊन पाहणी केली.

मृतदेहाच्या डोक्‍याचा चेंदामेंदा झाल्यामुळे ओळख पटवणे मुश्कील होते. त्यामुळे तारदाळ व कोरोची येथील पोलीस पाटील यांना बोलावून घेऊन सोशल मीडियावर त्याचा फोटो व्हायरल करण्यात आला. यानंतर त्याची ओळख पटली. संदीप घट्टे हा हमालीचे काम करीत होता. तो रात्रीपासून घरातून बाहेर होता तो परत आला नव्हता. मध्यरात्री कोणीतरी अज्ञात कारणाने त्याचा खून केला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, उपाधीक्षक बीबी महामुनी, शहापूरचे पोलीस निरीक्षक श्रीप्रसाद यादव यांनी भेट देऊन तपासाबाबत सूचना दिल्या.

आठवड्यामध्ये जवाहरनगर येथील हॉटेल चालक संतोष जाधव याचा तलवारीने निर्घृण खून करण्यात आला होता त्यानंतर आजच्या घडलेल्या घटनेने शहर परिसर हादरून गेला आहे. हा खून नेमका कोणत्या कारणातून झाला. हे अद्याप स्पष्ट नसले तरी एका पेक्षा जास्त जणांनी धारदार शस्त्राने खांद्याच्या वर डोक्यात वार केले. त्‍याच्‍या डोक्याच्या मागच्या भागातून मेंदू बाहेर पडला होता. घटनास्थळी पोलिसांना हत्यार अथवा अन्य साहित्य मिळून आले नाही. मारेकऱ्यांच्या शोधासाठी गुन्हे अन्वेषण शाखा, शिवाजीनगर व शहापूर पोलिस ठाण्याचे पोलिस पथक रवाना करण्यात आले आहे.

हेही वाचलं का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news