कोल्हापूर : यशवंत शिक्षक पतसंस्थेच्या चेअरमनपदी सदाशिव कांबळे तर व्हा. चेअरमनपदी नितीन जगताप यांची बिनविरोध निवड | पुढारी

कोल्हापूर : यशवंत शिक्षक पतसंस्थेच्या चेअरमनपदी सदाशिव कांबळे तर व्हा. चेअरमनपदी नितीन जगताप यांची बिनविरोध निवड

सरुड : पुढारी वृत्तसेवा : शाहूवाडी तालुका प्राथमिक शिक्षकांची यशवंत सहकारी पतसंस्था मर्यादित सरुड (ता. शाहूवाडी) या संस्थेच्या चेअरमनपदी सदाशिव कांबळे तर व्हा. चेअरमनपदी नितीन जगताप यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक व्ही. बी. जाधव यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड सभा झाली. निवडीनंतर शिक्षक बँकेचे संचालक शिवाजी रोडे-पाटील यांच्या हस्ते नुतन पदाधिकाऱ्यांचा फेटा, शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी निवडणुकीतून माघार घेत समन्वयाची भूमिका घेणाऱ्या संबंधित सात सभासदांचे पाटील यांनी आभार मानले.

संस्थेची सन २०२३-२४ ते २०२७-२८ ची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध झाली. अर्ज माघारीनंतर सदस्यांच्या एकूण १५ जागांसाठी तितकेच अर्ज रिंगणात राहिल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बिनविरोध निवडणुकीची औपचारिक घोषणा केली. संजय तळप, उमेश कुंभार, संजय जगताप, उत्तम खुटाळे आदींनी बिनविरोध निवडणुकीसाठी परिश्रम घेतले.

नूतन संचालक मंडळ खालील प्रमाणे : सदाशिव कांबळे (चेअरमन), नितीन जगताप (व्हा. चेअरमन), शिवाजी शामराव रोडे-पाटील, हेमंत वसंत भालेकर, अनिल नामदेव म्हाऊटकर, संपतराव पाटील, विक्रम पोतदार, सुनील पाटील, यशवंत पारळे, शिवाजी हिंदुराव पाटील, तौफिक पटेल, सुनील सुतार, संजय नामदेव आपटे, शोभा शिवाजी पाटील, सुरेखा चंद्रकांत यादव.

हेही वाचा : 

Back to top button