नेतृत्वाअभावी शिंदे गटाला पक्षांतराची झळ : संजय राऊत | पुढारी

नेतृत्वाअभावी शिंदे गटाला पक्षांतराची झळ : संजय राऊत

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा :  अडचणी समजून घेणारे ताकदीचे नेतृत्व नसल्याने शिंदे गटातील आमदार- खासदारांना पक्षांतराची झळ सोसावी लागत आहे, असा टोला मंगळवारी शिवसेना (ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेतून लगावला. खासदार गजानन कीर्तिकर यांच्या भाजपकडून मिळणाऱ्या सापत्न वागणुकीवरील वक्तव्यावर भाष्य करताना त्यांनी शिंदे गटावर घणाघात केला. लोकसभेत शिवसेनेचे १९ खासदार आहेत. त्यातील काही लोक आमच्याकडे नाहीत. परंतु, या जागेवर आमचे खासदार निवडून “कसे येतील, अशी भूमिका ठेवण्यात काही गैर नाही, असेदेखील राऊत यांनी स्पष्ट केले.

राज्यातील आमदारांसोबत खासदारही अपात्र होतील, असा दावा त्यांनी केला. भाजप नवीन मित्रांच्या शोधात असला, तरी आम्हाला आमंत्रण येणार नाही आणि आले तरी आम्ही जाणार नाही, असे राऊतांनी स्पष्ट केले. मोदी सरकारची नऊ वर्षे म्हणजे देशातील नागरिकांच्या नाकी नऊ आणणारी ठरली आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.

राज ठाकरे उत्तम होस्ट आहेत

राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीवर भाष्य करताना आमने राऊत म्हणाले, राज ठाकरे उत्तम होस्ट आहेत, लोकांचे स्वागत ते चांगले करतात. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचीच काय इतर कुणाची, कुठेही भेट घेतली तरीदेखील आम्हाला, शिवसेनेवर त्याचा कुठलाही परिणाम होणार नाही.

Back to top button