

कुरुंदवाड; पुढारी वृत्तसेवा : हिंदुस्थान हा कृषिप्रधान देश आहे. देशातील शेतकरी सुखावला पाहिजे हा दृष्टिकोन ठेवून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किसान सन्मान योजना, किसान पेन्शन योजना अंमलात आणून शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करत स्वप्नातील हिंदुस्थान साकारला आहे. श्रीमंतांबरोबरच सर्वसामान्यांचे हित जोपासणारा भाजप २०२४ सालच्या लोकसभा निवडणुकीत सत्तेची हॅट्रिक करेल, असा विश्वास भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष, माजी आमदार सुरेश हळवणकर यांनी केले.
कुरूंदवाड येथे वृंदावन मंगल कार्यालयात रविवारी भाजपाचा कार्यकर्ता मेळावा व डॉ संजय पाटील यांची केंद्रीय महामंडळावरती संचालकपदी निवड झाल्याबद्दल आणि महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चाच्या सचिव पदी अँड सुशांत पाटील यांची निवड झाल्याबद्दल सत्कार या संयुक्त कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. मिश्रीलाल जाजू, खादी ग्रामोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष हिंदुराव शेळके, माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे, जि.प.सदस्य विजय भोजे, डॉ. अशोकराव माने यांची प्रमुख उपस्थित होती.
यावेळी बोलताना डॉ. पाटील म्हणाले, सोसायटीच्या निवडणुकीपासून ते लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत सर्वच निवडणुकीत कार्यकर्त्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचा आदेश मानून केलेल्या कार्यामुळेच भाजपाचा झेंडा शिरोळ तालुक्यात सन्मानाने फडकत आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत कार्यकर्ते पुन्हा भाजपचा झेंडा फडकवतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी माजी नगरसेवक उदय डांगे, भाजपाचे शहराध्यक्ष राजेंद्र फल्ले, सुदर्शन माळी, सुनील डोंगरे, स्वप्निल श्रीधनकर, रवी शहापुरे, गीतन यादव, सुनील देबाजे, हेरवाड सरपंच रेखा जाधव, खिद्रापूर सरपंच सारिका कदम यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व विविध गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रा.प. सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक पोपट पुजारी यांनी केले. तर आभार मेजर सुनील पाटील यांनी मानले.
हेही वाचा :