Chhagan Bhujbal : भुजबळांच्या कानाखाली मारणार्‍यास लाखाचे बक्षीस

छगन भुजबळ
छगन भुजबळ

पुणे : अन्न आणि नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्या कानाखाली मारणार्‍या तरुणास एक लाखाचे बक्षीस देऊ, अशी वादग्रस्त घोषणा परशुराम सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित देशपांडे यांनी केली आहे. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेचे संभाजी भिडे यांच्यावर मंत्री भुजबळ यांनी टीका केली होती. ब्राह्मणांमध्ये संभाजी-शिवाजी अशी नावे नसतात.

भिडे यांचे नाव खरे नाव मनोहर असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. देशपांडे यांनी त्याला प्रत्युत्तर देताना सांगितले की, भुजबळांनी केलेले वक्तव्य हिंदू समाजात तेढ निर्माण करणारे आहे. यापूर्वीही त्यांनी सरस्वतीचा अपमान करणारे विधान केले होते.
ब्राह्मण समाजाविषयी आक्षेपार्ह विधाने ते करत आहेत. भुजबळांनी कोणाची पूजा करावी ही त्यांचा वैयक्तिक प्रश्न असल्याचे सांगत देशपांडेंनी टीका केली.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news