हातकणंगले लोकसभा मतदारसंघात तीन औद्योगिक वसाहती उभारणार : खा. धैर्यशील माने | पुढारी

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात तीन औद्योगिक वसाहती उभारणार : खा. धैर्यशील माने

इचलकरंजी, पुढारी वृत्तसेवा : हातकणंगले लोकसभा मतदारसंघात रोजगाराला चालना मिळावी, उद्योग-व्यवसाय वाढावेत यासाठी शिरोळ तालुक्यातील जांभळी, शाहूवाडी तालुक्यातील आवळी आणि डोणोली या गावात संयुक्त तर सातळी येथेही तिसरी औद्योगिक वसाहत उभारणी होणार आहे.

अकिवाट येथे शासन समर्पित धर्तीवर 250 एकरांमध्ये टेक्स्टाईलसाठी वेगळा झोन तसेच हातकणंगले तालुक्यात मल्टीमॉडेल लॉजिस्टिक पार्कचे काम गतीने सुरू असल्याची माहिती खा. धैर्यशील माने यांनी दिली. रेल्वे कृती समिती बैठकीच्या अनुषंगाने खा. माने इचलकरंजीत आले असता त्यांनी ही माहिती दिली.

ते म्हणाले, डबल इंजिन सरकारमुळे विकासकामे आता सुसाट आहेत. या माध्यमातून तीन औद्योगिक वसाहती तर इचलकरंजीजवळ वस्त्रोद्योगाशी संलग्न पार्क होणार असल्यामुळे त्याचा वस्त्रोद्योगाच्यास्विस्तारासाठी निश्चितच फायदा होईल. हातकणंगले येथेही मल्टीमॉडेल लॉजिस्टिक पार्कचे काम गतीने सुरू असून त्यावर केंद्रीय मंत्र्यांचे विशेष लक्ष आहे. यावेळी शिवसेना जिल्हाध्यक्ष रवींद्र माने, शहराध्यक्ष भाऊसो आवळे आदी उपस्थित होते.

संबंधित बातम्या
Back to top button