कोल्हापूर : वीज कनेक्शन जोडण्यासाठी लाच घेताना एकाला अटक | पुढारी

कोल्हापूर : वीज कनेक्शन जोडण्यासाठी लाच घेताना एकाला अटक

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यात वीज कनेक्शन जोडणीसाठी लाच घेताना एका अभियंत्यास रंगेहात पकडले. फॅब्रिकेशन व्यवसायाकरिता वीज कनेक्शन जोडण्यासाठी पंटर मार्फत एक हजार रुपयाची लाच घते होते. कंपनीच्या कनिष्ठ अभियंता साईनाथ नामदेव सनगर व पंटर शिरीष बंडू शेटे यांना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने सोमवारी अटक केली.

दोघांविरुद्ध पन्हाळा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार व्यक्तीने फॅब्रिकेशनचा व्यवसाय सुरू केला होता. विज कलेक्शन साठी तक्रारदार व्यक्तीने नावली येथील वीज वितरण केंद्रात अर्ज दाखल केला होता.

वीज कनेक्शन जोडण्यासाठी सनगर यांनी पंटर शेट्टी यांच्याकडे 1000 रुपये देण्यास बजावले होते. संबंधित व्यक्तीने याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. पोलिस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांनी सापळा रचून आज सकाळी दोघांना जेरबंद केले.

हेही वाचलत का?

Back to top button