Kolhapur News : एका रस्‍त्‍याचा प्रश्‍न... नांदणीतील तरुणाचं बेमुदत उपोषण सुरु | पुढारी

Kolhapur News : एका रस्‍त्‍याचा प्रश्‍न... नांदणीतील तरुणाचं बेमुदत उपोषण सुरु

जयसिंगपूर पुढारी वृत्तसेवा : पुण्यात नोकरी करणारा २४ वर्षाचा एक इंजिनियर तरुण गावातील रखडलेल्या रस्त्यासाठी  बेमुदत उपोषणाला बसला आहे. “जोपर्यंत रस्त्याचे काम चालू होणार नाही तोपर्यंत बेमुदत उपोषण चालूच राहील…!” असा त्‍यांनी निर्धार केला असून, आज या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. 

सविस्तर माहिती अशी की, इंजिनियर  असलेला रोहन मगदूम मूळचा नांदणी गावचा. (ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) तो पुण्‍यात नोकरी करतो.  रस्ता मंजुर होवूनही गावातील रस्त्याची दुरावस्था पाहता त्याने बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय घेतला. यासाठी सुट्टी घेतली. बुधवारपासून तो ग्रामस्‍थांबरोबर बेमुदत उपोषणाला बसला आहे. गावातील रस्त्याच्या काम सुरु होईपर्यंत उपोषण सुरुच राहिल, असा निर्धार त्‍याने केला आहे. 

Kolhapur News : रस्‍त्‍याच्‍या दुरावस्थेमुळे ग्रामस्‍यांचे हाल 

नांदणी येथील बसवेश्वर मंदिर ते हुवाज मळा या पाणंद रस्त्यासाठी ३ मे २०२२ रोजी आमदार राजेंद्र पाटील- यड्रावकर यांनी मातोश्री ग्रामसमृद्धी योजनेंतर्गत २४ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. असे असताना नांदणी सरपंच, ग्रामसेवक व बांधकाम विभाग शिरोळ यांच्याकडून कोणताही पाठपुरावा नसल्याने या रस्त्याचे काम अद्याप करण्यात आलेले नाही, असे रोहन मगदूम याचे म्‍हणणे  आहे. रस्त्याच्या दुरावस्थेमूळे ग्रामस्‍यांना अपघातही झाले आहेत. या मुद्द्यांसाठी रोहनसह काही गावकऱ्यांनी बुधवारी (दि.१५) उपोषणाला सुरुवात केली आहे. यावेळी रोहन मगदूम, काशीनाथ चव्हाण, संतोष भगाटे, श्रीकांत भगाटे, दादासो कयप्पा, बाबुराव ऐनापुरे, जकण्णा कयाप्पा, सुरेश धुळासावंत, संजय हातगिणे, शीतल चौगुले, कांचन मगदूम यांच्यासह नागरिक उपस्थित होते.  यावेळी त्याने एक पोस्टर तयार केले आहे. यावर त्याने काही प्रमुख प्रश्न उपस्थित करत नमूद केले आहेत. 

काय आहेत ग्रामस्‍थांचे प्रश्‍न ?

  • प्रमुख मुद्दे रस्ता मंजूर तारीख : २९ मार्च २०२२ होती. रस्‍ता मंजुरीला ११ महिने झाले तरी काम चालू का होत नाही?
  • पावसाळ्यात आणि इतर हंगामात रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था असते. खूप साऱ्या लोकांचे अपघात झाले आहेत. यास जबाबदार कोण?
  • माहितीच्या अधिकाराखाली रस्त्याच्या कामाची सद्यस्थितीबद्दल माहिती मागवली असता कोणतही सविस्तर उत्तर दिले जात नाही?
  • नांदणी ग्रामपंचायत या रस्त्याची डागडुजी का करत नाही?
  • मंजूर झालेल्या ३ रस्त्यांपैकी उर्वरित २ रस्त्यांचे माप मोजणी करून इंटीमेट तयार केले जाते, बसवेश्वर मंदिर ते हुवाज मळा रस्त्याबद्दल दुजाभाव का?
  • रस्त्याच्या दयनिक अवस्थेमुळे रस्त्यावर स्वतः नेते मंडळी अपघातग्रस्त झालेत, तरी पण नांदणी ग्रामपंचायत रस्त्याची कामे का करत नाही ?

या पोस्‍टरवर लिहलं आहे की,”आमरण उपोषणामूळे जर काही माझ्या जीवास धोका उद्भवला, तर यास सर्वस्वी शासन जबरदार असेल”. 

QR Code ची निर्मिती

रोहनने रस्त्याची दयनीय अवस्था, संबंधित मंजूर रस्त्याचे फोटो पाहण्यासाठी एक क्युआर कोडची निर्मीती केली आहे. हा क्युआर कोड (QR Code) स्कॅन केल्यानंतर तुम्हाला रस्त्याची सद्यस्थितीतील दयनीय अवस्था पाहता येईल. 

हेही वाचा 

 

 

Back to top button