पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रधानमंत्री कौशल विकास योजना 4.0 ची सुरुवात केली जाईल, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या. तरुणांना आंतरराष्ट्रीय संधी मिळाव्यात म्हणून कुशल बनवण्यासाठी विभिन्न राज्यांमध्ये ३० स्किल इंडिया इंटरनॅशनल सेंटर स्थापन केले जातील, असेही निर्मला सीतारमण म्हणाल्या.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या- तीन वर्षांमध्ये ४७ लाख तरुणांना मदत करण्यासाठी, एक अखिल भारतीय राष्ट्रीय शिक्षुता योजना अंतर्गत थेट लाभ हस्तांतरण सुरू केले जाईल.