असे काय घडले की मुश्रीफ- सोमय्या हायहोल्टेज ड्रामा थंडावला ? | पुढारी

असे काय घडले की मुश्रीफ- सोमय्या हायहोल्टेज ड्रामा थंडावला ?

कोल्हापूर , संतोष पाटील: ( मुश्रीफ- सोमय्या हायहोल्टेज ड्रामा ) ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या वादात कार्यकर्त्यांचा दगड कोल्हापूरच्या पोलिसांना आणि पोलिसांची लाठी कोल्हापूरकरांना बसेल, असे समाजस्वास्थ बिघडवणारे वातावरण निवळण्यात पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस यंत्रणेने समन्वय, संवादातून विश्वास निर्माण केल्यानेच हायहोल्टेज ड्राम्याचा पहिल्या आणि दुसऱ्या अंकावर शांततेत पडदा पडला.

सोमय्या यांनी १३ सप्टेंबरला मुश्रीफ यांच्या विरोधात बोगस कंपन्या, शेल कंपन्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणार आर्थिक गैरव्यवहार, बेनामी संपत्ती केल्याचे २७०० पानांचे पुरावे आयकर विभागाला सोपवल्याचे जाहीर केले.

यानंतर मुश्रीफ यांनी लगेच कोल्हापुरात पत्रकार परिषद घेऊन १०० कोटी दावा दाखल करणार असल्याचे सांगत प्रतिआव्हान दिले.

सोमय्या सक्तवसुली संचलनायाकडे (इडी) मुश्रीफ यांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी २० सप्टेंबरला कोल्हापुरात येण्याचे जाहीर केले.

कागल तालुक्यातील घोरपडे कारखान्याची पाहणी तसेच मुरगूड पोलिस ठाण्यात पुरावे सादर करुन गुन्हा दाखल करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते.

याचबरोबर मुश्रीफ यांच्यावर नलवडे कारखान्यात गैरव्यवहाराचा दुसरा आरोपही केला.

सोमय्या यांच्या आरोपानंतर खळवळलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार प्रत्युत्तर देण्याची भाषा केली. सोमय्या यांच्या दौऱ्यात अढथळा आणण्यासाठी मोठी फौज कामाला लागली.

मुश्रीफ यांचे सोमय्या यांच्या कोल्हापुरात येणार त्याच दिवशी हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जंगी स्वागताची तयारी केली.  सोमय्या यांचेही शक्तीप्रदर्शनासह स्वागत करणार असल्याचे भाजपने स्पष्ट केले.

२० सप्टेंबरच्या कोल्हापूर दौऱ्यासाठी निघण्याच्या तयारीत असतानाच १९ सप्टेंबरला दुपारी सोमय्या यांना मुंबई पोलीसांनी शहर न सोडण्याची नोटीस बजावली.

दरम्यान, जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीच्या बंदोबस्तांचा पोलिसांवरील कामाचा ताण आहे.

तसेच राजकीय तणावपूर्ण वातावरणामुळे सोमय्या यांना धोका असल्याने सोमय्या यांना कोल्हापूर जिल्हा बंदीची नोटीस बजावली.

सर्वसमावेशक कारवाईची १४४ ची नोटीशीद्वारे जमाबंदी आदेश लागू केला.

सोमय्यांना मुंबईतच रोखले

तरीही मुंबई पोलिसांना न जुमानता सोमय्या यांनी कोल्हापूरकडे रेल्वेने प्रयाण केले. रेल्वेत बसण्याआधी येथील स्थानिक पोलीस यंत्रणा ॲक्शन मोडमध्ये आली. पोलिस अधिकाऱ्यांनी सातरा ते कराडपर्यंत रेल्वेतच सोमय्या यांच्याशी चर्चा कोल्हापुरातील राजकीय वातावरण आणि कायदेशीर बाजू समजावून सांगितल्या. चर्चेअंती कराडमधून सोमय्या मुंबईला माघारी जाण्यास तयार झाल्याने पहिला हायहोल्टेज ड्रामा थंडावला. (मुश्रीफ- सोमय्या हायहोल्टेज ड्रामा )

साध्या वेशातील पोलिस जास्त

दरम्यान, मुश्रीफ यांचाही याच दिवशीचा नियोजित दौरा आणि स्वागत रद्द केले.

सोमय्या माघारी गेले यासर्वांमागे विशेषत: कोल्हापूर पोलिसांनी दाखवलेला सामंजस्य, समन्वय आणि संवादाचा पैलू होताच.

त्यानंतर सोमय्या यांच्या २८ सप्टेंबरच्या दुसऱ्या दौऱ्याची तयारी पोलिस प्रशासनाने पाच दिवसांपूर्वीच सुरू केली.

सोमय्या यांनी कागल येथील कारखाना भेट रद्द केली. तर मुश्रीफ यांनीही सोमय्या यांना विरोध न करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले.

दोन्ही घटकांनी एक पाऊल मागे येण्यात पडद्यामागेही घडामोडी घडल्या.

तणावाचे वातावरण कमी व्हावे, यासाठी सोमय्या यांच्या दुसऱ्या दौऱ्यात साध्या वेशातील पोलिस अधिक प्रमाणात तैणात ठेवल्याचे चित्र होते.   ( मुश्रीफ- सोमय्या हायहोल्टेज ड्रामा )

साक्री तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात जोरदार पाऊस; पिंपळनेरच्या पांझरा नदीला पूर

worst dress : प्रियांका ते कंगनापर्यंत ! या १० अभिनेत्रींच्या अतरंगी अवताराने सगळेच हैराण

दोन्ही बाजुंनी सामंजस्य

मुरगूड शहरात होवू शकणारी निदर्शनंही यंत्रणेने चर्चेतून थंड केली. आतापर्यंतच्या राज्यातील इतर नऊ गैरव्यवहाराच्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यासाठी आक्रमक भूमिका सोमय्या घेतल्याचे दिसत होते. मात्र, मुरगूड पोलिसांकडून तक्रारीची पोहोच घेवून आणखी पुरावे सादर करणार असल्याचे सांगून माघारी फिरले. यामागे पोलिस यंत्रणेने कायद्याच्या कसोटीवरील दिलेला विश्वास महत्त्वाचा ठरल्याचे सांगितले जाते. पोलिसांच्या प्रयत्नांना दोन्ही बाजूच्या घटकांनी दाखवलेल्या सामंजस्यामुळेच कोल्हापूरचे सामाजिक स्वास्थ हायहोल्टेज ड्राम्यात अबाधित राहिले.

संवादाचा सेतू कायम

पोलिस यंत्रणेच्या शांततेच्या प्रयत्नाना मंत्री मुश्रीफ आणि किरीट सोमय्या या दोघांनीही साथ दिली. दोन्ही बाजूंचा मान राखला जाईल, अशी व्यवस्था आणि मांडणी करण्यात पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी रणनिती कमालीची यशस्वी ठरली. मुश्रीफ-सोमय्या यांच्या आरोप-प्रत्यारोपांच्या राजकीय वादळात कोल्हापूरचे सामाजिक स्वास्थ बिघडले नाही.

हेही वाचा : 

Back to top button