कोल्हापूर : कुंभी-कासारीसाठी दुपारपर्यंत ५० टक्केच्यावर मतदान | पुढारी

कोल्हापूर : कुंभी-कासारीसाठी दुपारपर्यंत ५० टक्केच्यावर मतदान

दोनवडे; पुढारी वृत्तसेवा : कुडित्रे (ता.करवीर) येथील कुंभी कासारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आज (दि.१२) चुरशीने मतदान सुरू आहे. दुपारपर्यंत जास्त मतदान असणाऱ्या गावांत ५० टक्केहून अधिक मतदान झाले होते. मतदान प्रक्रिया अत्यंत शांततेत सुरू आहे.

कुंभी-कासारीसाठी दुरंगी लढत होत आहे. सकाळी आठ वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली. खुपिरे – ५१, दोनवडे – ५५, वाकरे – ५२, कुडित्रे – ५७, कोपार्डे – ६०, कोगे – ५५, सांगरुळ – ५७ या गावात सकाळी ११ वाजेपर्यंत ५० टक्केच्यावर मतदान झाले होते. एकूण २३ उमेदवार निवडायचे आहेत, एका मतदाराला ५ गटाचे पाच मतपत्रिका व आरक्षणाच्या चार अशा नऊ पत्रिका हातात दिल्या जातात. कोपार्डे (ता करवीर) येथे स.ब. खाडे महाविद्यालयात संस्था मतदारांना मतदान केंद्र करण्यात आले आहे. संस्था गटात आमदार सतेज पाटील, माजी आमदार चंद्रदीप नरके, अजित नरके, बाळासाहेब खाडे, गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील तर अ वर्ग सभासदांमध्ये शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी मतदानाचा हक्क बजावला.

हेही वाचा :

Back to top button