

पुढारी ऑनलाईन डेस्क : रमेश बैस यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली आहे. राष्ट्रपतींनी भगतसिंह कोश्यारी यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा स्वीकारला. सलग ६ वेळा खासदार आणि केंद्रीय मंत्री राहिलेले भाजप नेते रमेश बैस सध्या झारखंडचे राज्यपाल म्हणून कार्यरत आहेत. त्याआधी ते त्रिपुराचे देखील राज्यपाल राहिले आहेत.
रमेश बैस यांनी झारखंड विधानसभेने पारित केलेले 'झारखंड वित्त विधेयक-2022' भारतीय संविधानाचे उल्लंघन करते या कारणास्तव तीन वेळा माघारी पाठवले होते. हिंदी आणि इंग्रजी आवृत्त्यांमधील भाषांतरातील विविध विसंगतींमुळे पहिल्यांदा विधेयक परत केले. त्यानंतर झारखंड विधानसभेत सुधारित विधेयक मंजूर न करता पुन्हा राज्य सरकारने विधेयक त्यांच्या संमतीसाठी पाठवले. पण पुन्हा बैस यांनी राज्य सरकारला सुधारित विधेयक मंजूर करून पाठवण्यास सांगितले. तर तिसऱ्यांदा ते विधेयक भारतीय संविधानाचे उल्लंघन करते या कारणास्तव परत पाठवले होते.
हेही वाचा :