काँग्रेसने बाळासाहेब थोरातांना डावलले; नुतन समिती निवडीत स्थान नाही

काँग्रेसने बाळासाहेब थोरातांना डावलले; नुतन समिती निवडीत स्थान नाही

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : काँग्रेसने या महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या पक्षाच्या 85 व्या अधिवेशनासाठी मसुदा समिती आणि विविध उपसमित्यांची स्थापना केली आहे. या समित्या अधिवेशनातील कार्यक्रम आणि मंजूर करण्यात येणारे ठराव तयार करणार आहे. पक्षाने अधिवेशनासाठी महाराष्ट्रातील अनेक नेत्यांना प्रमुख जबाबदाऱ्या सोपवल्या आहेत. मात्र, या समित्यांमध्ये बाळासाहेब थोरात यांच्यावर कोणतीही जबाबदारी न सोपवल्याने राजकीय वर्तुळात चर्चां रंगली आहे.

काँग्रेसने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रानुसार, समितीमध्ये अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस संसदीय पक्षाच्या प्रमुख सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, ज्येष्ठ नेते एके अँटनी यांचा समावेश आहे. काँग्रेस सुकाणू समितीच्या सर्व सदस्यांचा या समितीमध्ये समावेश आहे.

अधिवेशनासाठी महाराष्ट्रातील अनेक नेत्यांना प्रमुख जबाबदाऱ्या सोपवल्या आहेत. पक्षाचे अध्यक्ष खर्गे यांनी मसुदा समिती आणि विविध उपसमित्यांची स्थापना केली आहे. मात्र, या समित्यांमध्ये बाळासाहेब थोरात यांच्यावर कोणतीही जबाबदारी सोपवलेली नाही. काँग्रेसने मसुदा समितीचे सदस्य म्हणून अशोक चव्हाण, मुकुल वासनिक आणि पृथ्वीराज चव्हाण यांची नियुक्ती केली आहे. तसेच उपगटात अशोक चव्हाण यांना संयोजक तर आरिफ नसीम खान आणि यशोमती ठाकूर यांना सदस्य म्हणून स्थान दिले आहे. मिलिंद देवरा, प्रणिती शिंदे आणि नितीन राऊत यांचा देखील उपसमूहात सदस्य म्हणून समावेश आहे. नाना पटोले यांना शेतकरी व कृषी उपगटाचे सदस्य करण्यात आले आहे. सामाजिक न्याय व सक्षमीकरण उपगटात मुकुल वासनिक यांची अध्यक्षपदी तर शिवाजीराव मोघे व विजय नामदेवराव वडेट्टीवार यांना सदस्य करण्यात आले आहे. वर्षा गायकवाड यांना युवा, शिक्षण व रोजगार उपगटात सदस्य म्हणून स्थान देण्यात आले आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news