हसन मुश्रीफांचे कार्यकर्ते आक्रमक, कागल बंदची हाक (VIDEO)

हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानसमोर व त्‍यांच्‍या निवासस्‍थानांच्‍या मार्गांवरही मोठा पोलीस बंदोबस्‍त तैनात करण्‍यात आला आहे.
हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानसमोर व त्‍यांच्‍या निवासस्‍थानांच्‍या मार्गांवरही मोठा पोलीस बंदोबस्‍त तैनात करण्‍यात आला आहे.

कागल, पुढारी वृत्तसेवा : माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ आणि माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांच्या घरावर आज (दि.११) सकाळी सक्‍तवसुली संचालनालयाने ( ईडी) छापे  टाकले. या कारवाईनंतर कागल शहरातील राष्‍ट्रवादी काँग्रेसचे  कार्यकर्ते आक्रमक झाले. त्‍यांनी या कारवाईच्‍या निषेधार्थ  कागल बंदची हाक दिली. दरम्यान, प्रकाश गाडेकर आणि आमदार हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानसमोर व त्‍यांच्‍या निवासस्‍थानांच्‍या मार्गांवरही मोठा पोलीस बंदोबस्‍त तैनात करण्‍यात आला आहे. हसन मुश्रीफ हे मुंबई येथे आहेत. या प्रकरणी माहिती घेऊन बोलतो, असे त्‍यांनी स्पष्ट केले आहे.

'ईडी'चे अधिकारी पोलिसांसोबत आज सकाळी कागल येथे आले. हसन मुश्रीफ व प्रकार गाडेकर यांच्‍या निवासस्थांनी 'ईडी' अधिकारी माहिती घेत आहेत.  दरम्यान, कागल शहरातील देवी चौक आणि आमदार हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानासमोर कार्यकर्त्यांनी  माेठी गर्दी केल्यामुळे स्थानिक पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. राष्‍ट्रवाद काँग्रेसचे कार्यकर्ते भारतीय जनता पक्षाचा निषेध करीत आणि आमदार हसन मुश्रीफ यांचा जयघोष करीत मोठ्या संख्येने निवासस्थानी दाखल झाले.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news