पुढारी ऑनलाइन डेस्क : NRI : विदेशात स्थायिक अनिवासी भारतीयांनी वर्ष 2022 मध्ये 100 अब्ज डॉलर्स भारताला पाठवले, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी सांगितले. एका वर्षात ही रकम 12 टक्क्यांनी वाढली आहे. मध्य प्रदेशातील इंदूर शहरातील प्रवासी भारतीय दिवस (PBD) अधिवेशनादरम्यान झालेल्या एका सत्रात त्या बोलत होत्या.
निर्मला यांनी यावेळी अनिवासी भारतीयांना "भारताचे खरे राजदूत" असे वर्णन केले. तसेच त्यांनी अनिवासी भारतीयांना शक्यतो भारतातील उत्पादने आणि सेवा वापरण्याचे आवाहन केले आहे. जेणेकरून देशाच्या वैयक्तिक ब्रँडचा जगभरात प्रचार केला जाऊ शकतो. NRI
यावेळी सीतारामन म्हणाल्या, चीन प्लस वन, युरोपियन युनियन प्लस वन धोरणांना टक्कर दे्यासाठी भारत जोरदार तयारी करत आहे. त्या म्हणाल्या चीन आणि EU व्यतिरिक्त ते त्यांचे कारखाने सुरू करू शकतील असा देश म्हणून सरकार भारताला बहुराष्ट्रीय कंपन्यांसमोर जोरदारपणे सादर करत आहे.
NRI : भारतीय डायस्पोरांनी देशातील लहान-मोठ्या व्यावसायिकांसोबत भागीदारी करावी
स्वातंत्र्याच्या अमृत काल दरम्यान अनिवासी भारतीयांच्या उद्योजकीय कौशल्यांचा उपयोग करता येईल. यासाठी भारतीय डायस्पोरांनी देशातील लहान आणि मोठ्या व्यावसायिकांसोबत भागीदारी केली पाहिजे, असे निर्मला यांनी सूचवले आहे.
विदेशात स्थायिक भारतीयांनी 2022 वर्षासाठी 100 अब्ज यूएस डॉलर्स पाठवले आहेत. हे अधोरेखित करण्यासारखे आहे. तसेच येणा-या सर्वाधिक रेमिटन्सपैकी हे एक आहे. 2021 च्या तुलनेत हे प्रमाण 12 टक्क्यांनी वाढले आहे.
कामानिमित्त परदेशात गेलेल्या भारतीयांबाबत निर्मला म्हणाल्या, "महामारीनंतरच्या एका वर्षात, लोकांना वाटले की भारतीय कामगार पुन्हा परदेशात परत जाणार नाहीत, ते केवळ परत गेले नाहीत तर खूप उपयुक्त रोजगारासाठी गेले आहेत आणि एका वर्षात रेमिटन्सची संख्या 12 टक्क्यांनी वाढली आहे." (NRI)
हे ही वाचा :