चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून करून पतीचा आत्महत्येचा प्रयत्न - पुढारी

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून करून पतीचा आत्महत्येचा प्रयत्न

उजळाईवाडी : पुढारी वृत्तसेवा

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून करून पतीने स्वतः आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना कणेरी माधवनगर ( ता.करवीर ) येथे गुरुवारी पहाटे घडली. कोमल निशिकांत चव्हाण ( वय २५,) असे खून झालेल्या महिलेचे नाव असून शशिकांत सुरेश चव्हाण
( वय ३० ) हे पतीचे नाव असून गोकुळ शिरगाव पोलिसांनी त्याला अटक केली आहे .

घटनेची माहिती मिळताच गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला करवीर विभागाचे पोलिस उपाधीक्षक आर आर पाटील यांनी देखील घटना स्थळी भेट दिली.

कोमल व निशिकांत चव्हाण( रा.डवरी वसाहत ,दौलतनगर कोल्हापूर ) यांचा सात वर्षांपूर्वी विवाह झाला होता. त्यांना दोन मुले असून निशिकांत हा गोकुळ शिरगाव एमआयडीसी मध्ये कामाला  आहे. तो कामानिमित्त कणेरी येथील माधवनगर मधील एकता कॉलनी येथे दीपक पोवार यांच्या घरात भाड्याने राहत होतो.

अलीकडच्या काही दिवसांमध्ये कोमलचे दुसऱ्या एकाशी प्रेमसंबंध असल्याचा संशय त्याला आला होता. त्यामुळे या दोघा पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत असे. याबद्दल फिर्यादी संतोष चव्हाण यांनादेखील बोलून दाखवले होते. कोमल सुधारली नाही तर मी तिला ठार मारणार, असे बोलत होता.

मामाला फोनवरून दिली खून केल्याची माहिती

बुधवारी रात्री या दोघा पती – पत्नींच्या मध्ये वाद झाला. या वादामध्ये निशिकांत चव्हाण यांने चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून केला. त्याने नायलॉनच्या दोरीने कोमलचा गळा आवळला. त्यानंतर गुरुवारी सकाळी ९ वा.५२ मि. फिर्यादी मामा संतोष चव्हाण यांना फोन केला. फोनवर त्याने मी रात्री दोन वाजता आमच्या दोघांच्यात वाद होऊन कोमलला ठार मारले आहे आणि मी स्वतः आत्महत्या करणार आहे असे सांगितले. हे नरेंद्रलाही सांगण्यास सांगितले.

फिर्यादी संतोष चव्हाण व नरेंद्र दोघे दुचाकीवरून माधव नगरला सकाळी १० वाजता आले. त्यावेळी निशिकांत हा राहत्या घरात सिलिंग फॅनला नायलॉनची दोरी बांधून गळफास लावून घेऊन स्टूलवर आत्महत्या करत असलेचा दिसला. पण दोरी तुटली आणि आत्महत्येचा प्रयत्न फसला. या घटनेची नोंद गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात झाली आहे. सपोनि प्रवीण पाटील पुढील तपास करत आहे .

आत्महत्या करण्याचा प्रयत्न फसला

पत्नीचा दोरीने गळा आवळून खून करून फोन करणारा पती आत्महत्या करत होता. पण त्याच्या जीवनाची दोरी घट्ट असल्याने गळफास लावलेली दोरी तुटली त्याचा आत्महत्येचा प्रयत्न फसला.

Back to top button